नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त सातपूर कॉलनी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर व्यायाम मंदिर व जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ यामध्ये १७ रक्तपिशव्यांचे संकलन झाले़ यावेळी अध्यक्ष डॉ़ अजितकुमार शिंदे, योगेश राणे, पद्माकर विंचूरकर, सतीश दीक्षित, मदन भंदुरे, अश्विन नाईक, मोहन काळे, योगेश बहाळकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सातपूरला १७ रक्तपिशव्यांचे संकलन
By admin | Updated: June 2, 2014 00:19 IST