शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

५८९५ जागांसाठी १६,६०२ हजार उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:16 IST

नाशिक: जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींमधील ५८९५ जागांसाठी १६,६०२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १७ हजार अर्जांची ...

नाशिक: जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींमधील ५८९५ जागांसाठी १६,६०२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १७ हजार अर्जांची छाननी होऊन अवघे ४०४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. मालेगावमधील सर्वधिक १११ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. दरम्यान, येत्या ४ जानेवारी रोजी अर्ज माघारीचा दिवस असल्याने निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याच्या राजकीय हालचाली एकीकडे सुरू असताना उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. जिल्ह्यात १३ तालुक्यातील तब्बल १७ हजार सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी (दि.३१) अर्ज छाननी प्रक्रियेत ४०४ उमेदवारांचे अर्ज कागदपत्रांची अपूर्तता व तांत्रिक अडचणीमुळे बाद ठरले. उमेदवारांची संख्या मोठी असल्याने गुरुवारी छाननी प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. शुक्रवारी याबाबतची अंतिम माहिती समोर आली. त्यानुसार १६ हजार ६०२ इतके उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या २१३२ प्रभागांमधील एकूण ५८९५ जागांसाठी निवडणूक होत आहे. कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त १७ इतकी सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. राजकीय हालचाली गतिमान होत असतानाच बिनविरोध साठी देखील प्रयत्न सुरू झाले आहेत. सिन्नर तालुक्यातील १०० तर मालेगावातील ९९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा फड रंगणार आहे. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक ९६९ सदस्य संख्या आहे.

गुरुवारी झालेल्या अर्ज छाननीत ४०४ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. कळवण तालुक्यातून ६, येवला १५, इगतपुरी ०, दिंडाेरी १७, त्र्यंबकेश्वर ०, सिन्नर ८६, निफाड ४२, बागलाण ३०, चांदवड ३४, देवळा ०२, नांदगाव ३२, मालेगाव १११, नाशिक २९ याप्रमाणे ४०४ अर्ज अवैध ठरले.

तालुका उमेदवार

कळवण ६०१

येवला १७७१

इगतपुरी १४७

दिंडोरी १३०१

त्र्यंबकेश्वर ५०

सिन्नर २६३९

निफाड २४०७

बागलाण ११०५

चांदवड १११५

देवळा ३३८

नांदगाव १६८५

मालेगाव २७००

नाशिक ७४३