शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

करंजगाव येथे पुरात अडकलेले १६ जण सुखरूप

By admin | Updated: August 3, 2016 22:51 IST

करंजगाव येथे पुरात अडकलेले १६ जण सुखरूप

निफाड : तालुक्यातील करंजगाव येथे मंगळवारी गोदावरीच्या महापुरात अडकलेल्या १६ लोकांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बुधवारी सकाळी १० वाजता पाण्याबाहेर काढले. मंगळवारी सायंकाळपासून तब्बल १४ तास ते सिद्धेश्वर मंदिर परिसरात अडकले होते. करंजगावचे सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी मध्यरात्री प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे, जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन यांना १६ लोक करंजगावी पुरात अडकल्याची माहिती दिली. त्यांनी पुण्याहून तत्काळ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकास पाचारण केले. करंजगावी सकाळी ७ वाजता निफाडचे तहसीलदार विनोद भामरे बचाव पथकासह दाखल झाले. तत्पूर्वी रात्रभर पुरात झाडावर सिद्धेश्वर मंदिर परिसरात अडकलेल्या अंकुशबाबा महादेव जोगदंड यांना करंजगावच्या कैलास पवार, सोमनाथ ससाने, रामदास ससाने, शरद जाधव, संदीप डंबाळे, सचिन डंबाळे या धाडसी युवकांनी सकाळी ६ वाजता पोहत जाऊन वाचविले. करंजगावच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे आगमन झाले. असिस्टंट कमांडेंट कुमार राघवेंद्रसिंघ यांच्या नेतृत्वाखालील ३० जवानांच्या पथकाने लागलीच बचावकार्य सुरू केले. करंजगावी तब्बल तीन तास त्यांचे बचावकार्य सुरू होते. त्यांनी रात्रभर पुराच्या वेढ्यात असलेल्या सिद्धेश्वर देवस्थानचे मुख्य पुजारी विठ्ठलनाथ महाराज, सूरजनाथ महाराज, मनोज राजोळे, वाळू गांगुर्डे या चार लोकांना सिद्धेश्वर मंदिर परिसरातून पुराबाहेर काढले. त्यानंतर ग्रामपालिका सदस्य प्रवीण पाटील राजोळे यांच्या शेतात पुराच्या वेढ्यात अडकलेले त्यांचे बंधू मनोज पाटील राजोळे, शेतमजूर बबनराव मुंडे, संगीता मुंडे, अनिल मुंडे यांच्यासह शेजारील निरभवणे वस्तीवरील नरहरी निरभवणे, परशराम आहेर, नंदा निरभवणे, रवींद्र निरभवणे, अश्विनी निरभवणे, सहा वर्षांची छोटी मुलगी प्रिया निरभवणे, प्रियंका निरभवणे यांना सुखरूप पुराच्या पाण्याबाहेर काढले.