शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

पाच महिन्यांत १६ खून !

By admin | Updated: June 2, 2017 01:30 IST

विजय मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मे महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात शहरात सुरू झालेल्या खून सत्रामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़

 विजय मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मे महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात शहरात सुरू झालेल्या खून सत्रामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ त्यातच पंचवटीतील किरण निकमच्या खुनानंतर शहरात टोळीयुद्ध सुरू झाले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ विशेष म्हणजे एका खुनाचा तपास पूर्ण होत नाही तोच पुन्हा दुसरी खुनाची घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच शंका व्यक्त केली जात आहे़ पोलीस आयुक्तांनी सामाजिक उपक्रम अवश्य राबवावेत, परंतु त्याबरोबरच शहरातील कायदा व सुव्यवस्था अन् गुन्हेगारी मुक्त अभियान सुरू करावे, अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त केली जात आहे़पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत़ या जागी आलेल्या नवीन पोलीस अधिकाऱ्यांना अजूनही शहराचा अभ्यास झालेला नाही की खबरे व कर्तव्यात ते कमी पडतात अशी परिस्थिती आहे़ शहरात कधीतरी नावालाच नाकाबंदी, आॅलआउट, कोम्बिंग आॅपरेशन सुरू असले तरी गुन्हेगारांवर त्याचा फारसा प्रभाव पडलेला नाही़ त्याचा फारसा उपयोग झालेला नाही़ शहर वाहतूक शाखा महसूल गोळा करण्यासाठी सुसाट झाली असून, पाच महिन्यात एकही चेनस्नॅचर सापडला नसला तरी एक कोटीहून अधिक महसूल मात्र त्यांनी गोळा केला आहे़पंचवटी परिसर गुन्हेगारी टोळी निर्मितीचे केंद्र व गुन्हेगाराचे आश्रयस्थानच बनले आहे़ शहरातील बहुतेक खून व टोळीयुद्धाचे धागेदोरे पंचवटीत येऊन थांबतात़ पूर्ववैमनस्यातून विधिसंघर्षित पाप्या शेरगीलचा पेठरोडवर भरदिवसा खून करण्यात आला़ यानंतर पंचवटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर दीपक अहिरे हा हमाल, सराईत गुन्हेगार अजित खिच्ची यांचा टोळक्याने खून केला़ तर पंचवटीतील नरोत्तम भुवन येथे रात्रीच्या वेळी दुकानाबाहेर झोपलेल्या भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या संशयितांचा पोलिसांना शोध लागलेला नाही़पंचवटीतील पाथरवट लेन व म्हसरूळ परिसरात टोळक्याने धारदार शस्त्रे फिरवून परिसरातील वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवली होती़ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला किरण निकम या युवकाची नवनाथनगरमध्ये खून करण्यात आला़ या खुनाचा बदला घेण्यासाठी पंचवटी परिसरातील काही गुन्हेगारांनी उपनगरला मामाकडे आलेला तुषार साबळे याचा केवळ चेहरा साधर्म्यामुळे गोळ्या झाडून शस्त्रास्त्राने वार करून खून केला़ एकंदरीतच शहरातील वाढत्या खुनाच्या, जिवे ठार मारण्याच्या घटना पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे़ त्यातच पंचवटीतील सराईत गुन्हेगारांच्या खूनसत्रामुळे नाशकात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका उडाला असून, यावर नियंत्रण आणण्याचे काम पोलीस आयुक्तांना करावे लागणार आहे़