शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

वाळूच्या अकरा डंपरवर आरटीओकडून सोळा लाख दंडाची आकारणी

By admin | Updated: May 22, 2017 01:26 IST

सटाणा : पोलिसांनी मुजोर वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी गेल्या बुधवारी विशेष मोहीम हाती घेत तब्बल अकरा वाळूचे डंपर पकडले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क सटाणा : बागलाण तालुक्यातील जायखेडा आणि सटाणा पोलिसांनी मुजोर वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी गेल्या बुधवारी विशेष मोहीम हाती घेत तब्बल अकरा वाळूचे डंपर पकडले होते. पोलिसांनी पकडलेल्या वाळूच्या सर्वच डंपरचे वजन केल्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारीही खडबडून जागे झाले आणि त्यांना सोळा लाख रु पये दंड भरून घेण्यास भाग पाडले. एकीकडे आरटीओ कारवाई करून मोकळे झाले असताना, दुसरीकडे मात्र महसूल यंत्रणा अजूनही चुप्पी साधून आहे. अद्यापही कारवाई न केल्याने यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.तापी नदीमधून बेसुमार वाळू उपसा करून विनापरवाना नाशिक, ठाणे, मुंबई या बड्या शहरांमध्ये वाळू पुरवठा करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटमध्ये राजकारणातील अनेक बड्या हस्तीदेखील पार्टनर असल्यामुळे राजरोस वाळू तस्करीचा गोरखधंदा तेजीत सुरू आहे. शहादा, नंदुरबार परिसरातील तापी नदीपात्रातून दररोज सुमारे दीडशे डंपर वाळूची बेकायदा वाहतूक होते. वाळूच्या ओव्हरलोडमुळे रस्त्यांची वाट लागते, तर वाळू चोरीमुळे शासनाचा दररोज कोट्यवधी रु पयांचा महसूल बुडतो आहे. असे असताना पोलीस यंत्रणेशी हमरीतुमरीची भाषा वापरणाऱ्या मुजोर वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी गेल्या बुधवारी जायखेडा व सटाणा पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली आणि तब्बल अकरा वाळूचे डंपर पकडले. यामुळे वाळूमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले. सटाणा पोलीस ठाण्याच्या इतिहासात वाळूमाफियांविरुद्ध पहिलीच कारवाई होती. पोलिसांनी वाळूमाफिया मोकळे सुटायला नको म्हणून वाळूचे डंपर पकडल्यानंतर तत्काळ त्यांचा काटा करून सर्वच वाहने जप्त करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी आपल्या कारवाईचा अहवाल मालेगाव प्रादेशिक परिवहन विभागाला सादर केला. अधिकाऱ्यांनी तत्काळ वाहनांची पाहणी करून या अकरा वाहनांवर सोळा लाख रु पयांचा दंड आकारला.महसूल यंत्रणेची चुप्पी...सटाणा-ताहाराबाद रोडने राजरोस वाळूची तस्करी सुरू असताना तिला रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेने प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले; मात्र या कारवाईसाठी पोलिसांनी महसूल यंत्रणेकडे मदत मागितली असता त्यांनी पथक देण्यास साफ नकार देऊन एकप्रकारे कारवाई करण्यास असमर्थताच दर्शविली. महसूलच्या या भूमिकेमुळे यंत्रणा अधिकच संशयाच्या भोवऱ्यात सापडली. डंपर पकडल्यानंतर आरटीओने तत्काळ दुसऱ्या दिवशीच सोळा लाख रुपये आपल्या तिजोरीत भरून घेतले. मात्र पाच दिवस उलटूनही महसूल यंत्रणा कारवाईबाबत चुप्पी साधून असल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. एकीकडे सटाण्याचे तहसीलदार मालेगाव महापालिकेच्या इलेक्शन ड्यूटीवर असताना, दुसरीकडे सटाण्यातील छोट्यामोठ्या वाळू तस्करांना रात्रंदिवस सावलीसारखे आपल्या सोबत घेऊन फिरणारे त्यांचे सहकारी अधिकारी मात्र कारवाई करण्याऐवजी दोन दोन वेळा विविध अ‍ॅँगलने डंपरचे फोटो काढून काय साध्य करताहेत हे त्यांनाच ठाऊक. एकंदरीत वाळूचे डंपर पकडून पाच दिवस उलटले तरी अद्याप महसूल यंत्रणेने कोणतीही कारवाई न केल्यामुळे यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.वाळू तस्करांविरु द्ध सर्वात मोठी कारवाई सटाणा पोलिसांच्या इतिहासात वाळूमाफियांविरुद्ध ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आरटीओ यंत्रणादेखील हादरली आहे. मालेगावचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव यांनी प्रत्यक्ष सटाणा येथे भेट देऊन डंपरची पाहणी केली. त्यानंतर सोळा लाख रु पये दंड भरण्याचे आदेश दिले. दरम्यान, स्वामित्वहक्काची पावती नसलेले व पावतीपेक्षा अधिक वाळू भरून तस्करी केल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. महसूल विभागाने कायदेशीर कारवाई केल्यास सत्तावीस लाख रु पये दंड वसुलीस पात्र राहतील, असे एका महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे महसूल आणि आरटीओ या दोन्ही विभाग मिळून ४३ लाख रु पये दंड शासनच्या तिजोरीत पडणार आहे. त्यामुळे सटाणा पोलीस ठाण्याच्या इतिहासात सर्वात मोठी कारवाई मानली जाणार आहे.