शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

कळवण गटात १६; गणात ४२ उमेदवार

By admin | Updated: February 14, 2017 00:08 IST

निवडणूक : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी तालुक्यात दोन गटात ७, तर सहा गणात १७ माघारी

कळवण : जिल्हा परिषदेच्या मानूर व अभोणा गटातून सहा इच्छुक उमेदवारांनी, तर पंचायत समितीच्या खर्डेदिगर, मोकभणगी, निवाणे, बापखेडा, अभोणा व नरूळ गणातून १७ इच्छुकांनी माघार घेतल्याने चार गटातून १६, तर आठ गणातून ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी अभोणा गटातून, तर गणातून डी. एम. गायकवाड, नरूळ गणातून सरला देवरे या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांनी माघार घेतल्याने अभोणा गटावर कॉँग्रेस वर्चस्वाची परंपरा कायम रहाणार आहे.मानूर गटात राष्ट्रवादी कॉँग्रेस व माकप अशी दुरंगी लढत होणार आहे. या गटातून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य भारती पवार निवडणूक लढवित आहे. अभोणा गटात कॉँग्रेस, भाजपा व माकप अशी तिरंगी लढत होणार आहे.कनाशी गटात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, माकप व अपक्ष अशी पंचरंगी लढत होणार आहे. या गटातून जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार रिंगणात आहे. खर्डेदिगर गटातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निवडणूक लढवित आहेत. मोकभणगी गणात राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, भाजपा, माकप व अपक्ष अशी पंचरंगी लढत होत आहे. निवाणे गणातून राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना, भाजपा, माकप व अपक्ष अशी षष्टरंगी लढत होत आहे. मानूर गणात राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, माकप व अपक्ष अशी चौरंगी लढत होत आहे. बापखेडा गणातून राष्ट्रवादी र्कांग्रेस, कॉँग्रेस, भाजपा, माकप अशी चौरंगी लढत होत आहे. कनाशी गणात राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, भाजपा, माकप व अपक्ष अशी षष्टरंगी लढत होत आहे.अभोणा गणातून राष्ट्रवादी र्कांग्रेसचे कळवण बाजार समतिीचे संचालक डी. एम. गायकवाड, तुळशिराम बागुल, जयराम ठाकरे, मनोहर ठाकरे यांनी माघार घेतल्याने कॉँग्रेस, भाजपा, शिवसेना, माकप व अपक्ष अशी षष्टरंगी लढत होईल.नरूळ गणातून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सरला देवरे, सरला मोरे, मनीषा देवरे यांनी माघार नोंदवल्याने कॉँग्रेस, भाजपा, शिवसेना, भाजपा, माकप व अपक्ष अशी पंचरंगी लढत होणार आहे .माघारीनंतर जिल्हा परिषद खर्डेदिगर गटात सहा, मानूर गटात दोन, कनाशी गटात पाच, तर अभोणा गटातून तीन उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समितीच्या खर्डेदिगर गणातून सहा, मोकभणगी गणातून पाच, निवाणे गणातून सहा, मानूर गणातून चार, बापखेडा गणात चार, कनाशी गणात सहा, अभोणा गणात सहा, तर नरूळ गणातून पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.मानूर व अभोणा येथे चुरसमानूर गणात कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांचा अर्ज अवैध झाल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेससमोर माकपचे आव्हान असले तरी कॉँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. अभोणा गटात कॉँग्रेससमोर भाजपा व माकपचे आव्हान असले तरी कॉँग्रेसचा गट व गणात ‘एकला चलो रे’चा नारा असणार आहे. समझोता व राजकीयदृष्ट्या बेरजेचे राजकारण राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून तालुक्यात झाले. कनाशी व खर्डेदिगर गटात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विरोधात कॉँग्रेस उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने दोन गटात आघाडी, तर दोन गटात मैत्रिपूर्ण लढत बघायला मिळणार आहे. (वार्ताहर)