शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

१६ शेतकऱ्यांची फसवणूक : पिंपळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; महिनाभरातील तिसरी घटना द्राक्ष व्यापाºयाकडून २८ लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:09 IST

कसबे सुकेणे : सोळा द्राक्ष उत्पादकांची साडेअठ्ठावीस लाख रु पयांची फसवणूक करून द्राक्ष व्यापाºयाने पोबारा केला आहे.

ठळक मुद्देद्राक्ष खरेदीपोटी दिलेले धनादेश न वटल्याने फसवणूक सर्व शेतकºयांनी गुरुवारी पिंपळगाव बसवंत गाठले

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील सोळा द्राक्ष उत्पादकांची साडेअठ्ठावीस लाख रु पयांची फसवणूक करून एका द्राक्ष व्यापाºयाने पोबारा केला आहे. गुरुवारी (दि. ५) सदर व्यापाºयाचा शोध घेऊनही तो मिळून न आल्याने व द्राक्ष खरेदीपोटी दिलेले धनादेश न वटल्याने फसवणूक झालेल्या सोळा शेतकºयांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना पुन्हा एकदा द्राक्ष व्यापाºयाने शेतकºयांची फसवणूक केली आहे. निफाड तालुक्यातील देवपूर, दावचवाडी, रौळस पिंपरी, लोणवाडी, पाचोरे वणी, जोपूळ, रुई येथील सुमारे सोळा शेतकºयांनी त्यांचा द्राक्ष माल द्राक्ष व्यापारी राजकुमार परशराम चुग, अजमेर (राजस्थान) हल्ली मुक्काम पिंपळगाव यांना उधारीवर दिला होता. द्राक्ष व्यवहारापोटी सदरच्या व्यापाºयाने बहुतांश शेतकºयांना धनादेश दिले होते, तर काहींना रोख रक्कम देण्याचे कबूल केले होते; परंतु गेल्या काही दिवसांपासून बºयाच शेतकºयांचे धनादेश न वटल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या सर्व शेतकºयांनी गुरुवारी दुपारी पिंपळगाव बसवंत गाठले. पिंपळगाव बसवंत येथे सद्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणी शोध घेतला असता व्यापारी मिळून आला नाही तसेच मोबाइलही बंद असल्याने राजस्थानमधील मूळगावी तपास केला तेथेही तो नसल्याचे समजले, अशी माहिती संतोष शिरसाठ यांनी दिली. दरम्यान, व्यापाºयाच्या विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ निफाड तालुक्यातून गेल्या महिन्यात उगाव परिसरातही द्राक्ष व्यापारी पळून जाण्याची घटना ताजी असताना आजची ही घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे द्राक्षपंढरीतील द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत. द्राक्ष व्यापाºयाकडून फसवणूक झाल्याची तक्र ार दाखल करण्यासाठी सर्व सोळा शेतकरी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे येथे गेले असता, तेथे तक्र ार दाखल करण्यास पोलिसांनी सुरु वातीला टाळाटाळ केल्याची माहिती संतोष शिरसाठ यांनी दिली. तक्र ार ऐकून घेण्याऐवजी पोलिसांकडून शेतकºयांना उलट उपदेश करण्यात आल्याचे समजते. त्यानंतर या शेतकºयांनी ही कैफियत पिंपळगाव बाजार समितीचे सभापती माजी आमदार दिलीप बनकर व आमदार अनिल कदम यांच्याकडे मांडली.