शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाच्या चाळीस जागांसाठी १५९ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:02 IST

येत्या ७ आॅक्टोबर रोजी होणाºया बागलाण तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्र वारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसी एकूण १४० प्रभागातील ३५२ जागांसाठी ५४८ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर प्रथमच थेट सरपंचपदाच्या ४० जागांसाठी १५९ इतके विक्र मी उमेदवारी अर्ज दाखल झाले. शुक्रवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्यामुळे तहसील आवारात इच्छुकांनी गर्दी केली होती.तर बहुतांश सरपंचपदाच्या इच्छुकांनी शिक्तप्रदर्शन करत अर्ज भरल्याने या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.

सटाणा : येत्या ७ आॅक्टोबर रोजी होणाºया बागलाण तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्र वारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसी एकूण १४० प्रभागातील ३५२ जागांसाठी ५४८ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर प्रथमच थेट सरपंचपदाच्या ४० जागांसाठी १५९ इतके विक्र मी उमेदवारी अर्ज दाखल झाले. शुक्रवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्यामुळे तहसील आवारात इच्छुकांनी गर्दी केली होती.तर बहुतांश सरपंचपदाच्या इच्छुकांनी शिक्तप्रदर्शन करत अर्ज भरल्याने या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. बागलाण तालुक्यातील तब्बल चाळीस ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. येत्या दोन वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यामुळे गल्लीतील राजकारणाचे दिल्लीच्या राजकारणावर परिणाम होत असल्यामुळे या निवडणुकीला देखील महत्व प्राप्त झाले आहे. यंदा प्रथमच थेट सरपंचपदाची निवडणूक होत असल्यामुळे बागलाण तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाल्याचे चित्र आहे. आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसी इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरले. अर्जांची सोमवार दि.२५ सप्टेंबर रोजी छाननी करण्यात येणार असून २७ सप्टेंबरला अर्ज माघारीचा अंतिम दिवस राहणार आहे. दरम्यान बहुतांश सदस्य पदासाठीच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता असून सरपंच पदासाठी गोळवाड ,मळगाव खुर्द येथे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने येथील सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे.ग्रामपंचायतनिहाय दाखल केलेले अर्जकंसात सदस्यपदासाठी दाखल अर्जांची संख्या अशी - जायखेडा १३ (४१) , औंदाणे २ (१५) ,वीरगाव ५ (२६) ,पिंपळकोठे ८ (१७) ,आसखेडा ६ (१९),आराई ६ (३२) ,टेंभे खालचे २ (९) ,मुंजवाड ९ (२९) ,मोरेनगर ४ (२२) , वटार २ (१७) ,महड ३ (११) ,गोराणे ५ (१५) ,देवठाण दिगर २ (३) , गोळवाड १ (८) ,चौगाव ४ (२३),भिमखेत ३ (९) ,किकवारी २ (३) , वनोली २ (११) ,माळीवाडा ५ (१७) ,जाखोड ३ (७) ,कातरवेल २ (७) , डोंगरेज ४ (४) ,मळगाव खुर्द १ (२) ,वाघळे ६ (११) ,आनंदपूर ४ (८) , मुंगसे ३ (१३) ,मुल्हेर ४ (३०) ,टेंभे वरचे ८ (८) ,निकवेल २ (१९) ,वाघंबा ४ (५ ),तळवाडे भामेर ७ (१२) ,तिळवण ४ (१२) ,तळवाडे दिगर ३ (९) , तांदुळवाडी ४ (१२) ,मानूर ३ (१०) ,खिरमाणी ४ (११) ,मळगाव तिळवण ३ (९) ,आव्हाटी ४ (१२) ,चौंधाणे २ (२०)