शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत १५० जणांना विषबाधाचर्चासत्र भोवले : एका शेतकºयाचा दुर्दैवी मृत्यू; नाशिक, पिंपळगावी उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:12 IST

दिंडोरी : तालुक्यातील उमराळे बु।। येथे धात्रक वस्तीवर एका बियाणे कंपनीने टमाटा उत्पादक शेतकºयांसाठी घेतलेल्या चर्चासत्र कार्यक्रमानंतर दिलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याने एका शेतकºयाचा मृत्यू, तर सुमारे १५०हून अधिक शेतकºयांना बाधा झाल्याची घटना बुधवारी घडली. बाधीत शेतकºयांवर नाशिक व दिंडोरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देउमराळे बु।। येथे धात्रक वस्तीवर एका बियाणे कंपनीने टमाटा उत्पादक शेतकºयांसाठी घेतलेल्या चर्चासत्र अतुल केदार (४१) यांचे उपचारादरम्यान निधन

दिंडोरी : तालुक्यातील उमराळे बु।। येथे धात्रक वस्तीवर एका बियाणे कंपनीने टमाटा उत्पादक शेतकºयांसाठी घेतलेल्या चर्चासत्र कार्यक्रमानंतर दिलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याने एका शेतकºयाचा मृत्यू, तर सुमारे १५०हून अधिक शेतकºयांना बाधा झाल्याची घटना बुधवारी घडली. बाधीत शेतकºयांवर नाशिक व दिंडोरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पेठरोडवरील उमराळे बुद्रुक येथे रमेश मनोहर धात्रक यांच्या वस्तीवर बायर सीड कंपनीने बुधवारी संकरित टमाटा पीकपहाणी व चर्चासत्र आयोजित केले होते. सदर चर्चासत्र दुपारी १ वाजता संपल्यानंतर उपस्थित सुमारे १५० शेतकºयांनी येथे जेवण केले. काही वेळाने त्यातील काही शेतकºयांना मळमळ, उलटीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना त्यांच्या नातेवाइकांनी नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील अतुल केदार (४१) यांचे उपचारादरम्यान निधन झाले.आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले, माजी आमदार धनराज महाले, प्रांत उदय किसवे, तहसीलदार गाढवे, कैलास मवाळ, माधवराव साळुंखे यांनी रुग्णांची विचारपूस केली. रुग्णालयात प्रमोद अपसुंदे, रामचंद्र मेधने, रामू अपसुंदे, शांताराम अपसुंदे, राजेंद्र केदार, स्वप्नील केदार, राजेंद्र थेटे, नीलेश नागरे, उत्तम केदार, अंकुश केदार, मंगेश कदम, बबलू गवारे आदींवर उपचार सुरू आहे. चौघे जिल्हा रुग्णालयात विषबाधा झालेल्या चार रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ या रुग्णांमध्ये छबाबाई धोंडीराम कडाळी (३४), किसन सुखा कडाळी (६०), बाळू लक्ष्मण जाधव (५५) व मनीषा सुनील कडाळी (३२, सर्व रा़ उमराणे, ता़ दिंडोरी, जि़ नाशिक) यांचा समावेश आहे़ उर्वरित रुग्णांना शहरातील अपोलो हॉस्पिटल, दिंडोरी, पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहेग़ुरुवारी रात्री नाशिक जिल्हा रु ग्णालयात ४० तर दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात १२ शेतकºयांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. दिंडोरी व नाशिक येथील रुग्णालयात ५० हून अधिक रु ग्ण दाखल आहे.