शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

येवल्याजवळ बस अपघातात १५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 02:03 IST

येथून ५ किलोमीटर अंतरावर म्हसोबा मंदिरानजीक, कृष्णा एन्झीटेक कंपनीच्या वळणावर शिर्डी येथील साईबाबा संस्थानची बस आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत १२ साईभक्त जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. जखमींत ७ पुरुष, ४ महिला तसेच चार बालकांचा समावेश आहे.

येवला : येथून ५ किलोमीटर अंतरावर म्हसोबा मंदिरानजीक, कृष्णा एन्झीटेक कंपनीच्या वळणावर शिर्डी येथील साईबाबा संस्थानची बस आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत १२ साईभक्त जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. जखमींत ७ पुरुष, ४ महिला तसेच चार बालकांचा समावेश आहे.  आंध्र प्रदेश येथील रहिवाशी असलेल्या ३२ साईभक्तांना सोमवारी रात्री ९ वाजेच्या अजंता एक्स्प्रेसने नगरसूल येथून परतीच्या प्रवासाला जायचे होते. साईबाबा संस्थानची एमएच-१७ एजी ९७४७ या क्रमांकाच्या बसने चालक आप्पासाहेब रक्ताटे ३२ साईभक्तांना घेऊन शिर्डीहून नगरसूल रेल्वे स्टेशनकडे  जाण्यासाठी सोमवारी सायंकाळी सहा वाजता निघाले. दरम्यान सांयकाळी सातच्या सुमारास ही बस येवल्यानजिक म्हसोबा मंदिराजवळील कृष्णा एन्झीटेक कंपनीच्या वळणावर आली. त्याच सुमारास कोपरगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरचे टायर फुटल्याने तो बसवर आदळला. ही धडक इतकी जोरदार होती की, बसवर आदळल्यानंतर तो ५०० मीटर अंतरावरील काटवनात जावून पलटी झाला. या धडकेत चालकाच्या बाजूने बसलेले १५ प्रवाशी जखमी झाले. या जखमींना तत्काळ येवला येथील ग्रामीण उपजिल्हा रु ग्णालयात हलवले. तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी शिर्डी येथील साईबाबा रु ग्णालयात हलविण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्यासह सौरभ कुलकर्णी, निलेश कुमावत, पप्पू पाटोळे, अनिल शिनगर, सागर वाडेकर व सहकाºयांनी मदत कार्य केले.  दरम्यान कंटेनर चालक कंटेनर चालक भगवान कुंभार यास पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघात