शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरमधून १५ विद्युत मोटारी जप्त

By admin | Updated: February 29, 2016 23:50 IST

कारवाई : कमोदनगरला मोहीम

इंदिरानगर : पाणी नियोजनासाठी महापालिकेला कसरत करावी लागत असून, पाणी बचतीसाठी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार शहरात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असला तरी काही नागरिक पालिकेची फसवणूक करीत असल्याची बाब उघड झाली आहे. पालिकेने धडक तपासणी मोहीम राबवून परिसरातून सुमारे १५ विद्युत मोटारी जप्त केल्या आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला विद्युत मोटार लावून घरामध्ये पाणी ओढले जात असल्याची बाब सिडकोसह इंदिरानगर परिसरात समोर आली आहे. पाण्याच्या बाबतीत या दोन्ही उपनगरांमध्ये नेहमीच ओरड केली जाते. मात्र परिसरातील नागरिकच पाण्याची चोरी करीत असल्याचे समोर आल्याने पालिकेवर खापर फोडणाऱ्यांना चपराक बसली आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्या कमोदनगर परिसरातून १५ विद्युत मोटारी ताब्यात घेण्यात आल्या असून, दोघांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. परिसरात गेल्या चार दिवसांपासून धडक मोहीम राबविली जात आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून मैत्री, निवांत, सप्तशृंगी, रेणुका यांसह विविध अपार्टमेंटमध्ये मोटारीद्वारे पाणी ओढले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुमारे १५ मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. साईवंदना अपार्टमेंटमधून पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. रायगड सोसायटीची नळजोडणी बंद करण्यात आली. तसेच २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. विभागीय अधिकारी वसुधा कुरनावळ यांच्या माार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी मोहीम राबविली (वार्ताहर)