शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कर्मचाऱ्यांना १३,५०१ सानुग्रह अनुदान

By admin | Updated: November 3, 2015 23:23 IST

महापौरांची घोषणा : दिवाळीपूर्वीच रक्कम

नाशिक : महानगरपालिकेच्या ६५७५ कर्मचाऱ्यांना दिवाळी उत्सवासाठी १३ हजार ५०१ रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा महापौर अशोक मुर्तडक यांनी मंगळवारी केली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सानुग्रह अनुदानात ३९० रुपयांनी वाढ करण्यात आली असून, या अनुदानाच्या वितरणामुळे महापालिकेवर ८ कोटी ८७ लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. यंदा महापालिकेच्या आर्थिक स्थितीमुळे सानुग्रह अनुदानात कपात होण्याची चर्चा कानी पडत असतानाच महापौरांनी अल्पशी का होईना वाढ सुचवत अनुदान जाहीर केल्याने कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. दिवाळीचा उत्सव अवघ्या पाच-सात दिवसांवर येऊन ठेपला असताना महापालिकेकडून सानुग्रह अनुदानाबाबत कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचारीवर्गात अस्वस्थता होती. दरम्यान, विविध कामगार संघटनांनी महापौरांकडे यापूर्वीच यंदा कर्मचाऱ्यांना १५ ते २१ हजार रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान देण्याची मागणी लावून धरली होती. त्यानुसार, मंगळवारी दुपारी महापौर अशोक मुर्तडक यांनी सर्वपक्षीय गटनेते, पदाधिकारी यांची बैठक बोलावून सानुग्रह अनुदानासंबंधी चर्चा करत निर्णय घेतला. यावेळी उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, सभागृहनेते सलीम शेख, विरोधी पक्षनेता प्रा. कविता कर्डक, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते, मनसेचे गटनेते अनिल मटाले, माकपचे गटनेते तानाजी जायभावे, भाजपाचे गटनेते संभाजी मोरुस्कर, मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले यांच्यासह मुख्य लेखाधिकारी राजेश लांडे उपस्थित होते. बैठकीत चर्चा केल्यानंतर महापौरांनी पत्रकारपरिषदेत १३ हजार ५०१ रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. बोनस अ‍ॅक्टनुसार कर्मचाऱ्यांना बोनस देता येत नसल्याने राज्य शासनाच्या परवानगीशिवाय सानुग्रह अनुदान देता येते. यंदा महापालिकेची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नाही तरीही यंदा सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्यात येईल. आॅक्टोबर २०१५ अखेर जे कर्मचारी-कामगार वेतनपटावर असेल त्या सर्वांना या सानुग्रह अनुदानाचा लाभ होणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)