लोकमत न्युज नेटवर्कयेवला : शहरासह तालुक्यातील १३ संशयीतांचे कोरोना अहवाल बुधवारी (दि. २) पॉझीटीव्ह आले आहेत. तालुक्यातील नगरसूल येथील ६५ वर्षीय वृध्दाचा नाशिक येथे जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर होम आयसोलशनमध्ये असणारे १० बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.बाधितांमध्ये येवला शहरातील साईिवहार कॉलनीतील ४० वर्षीय पुरूष, श्रीकृष्ण कॉलनीतील ४८ वर्षीय महिला, २६ वर्षीय पुरूष, फत्तेबुरूज नाका येथील ४५ वर्षीय पुरूष, पारेगाव रोड भागातील ४५ वर्षीय पुरूष, तालुक्यातील नगरसूल येथील ६५ वर्षीय पुरूष, अंदरसूल येथील ७३, ४७, २४ वर्षीय पुरूष, अंगणगाव येथील २८ वषीय पुरूष, कोटमगाव येथील ६३ वर्षीय पुरूष, आडगाव चोथवा येथील ४१ वर्षीय पुरूष, मुखेड येथील ४४ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.मंगळवारी (दि.१) शहरातील २ अहवाल पॉझीटीव्ह आले होते. तर ४ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले होते.तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ३८८ झाली असून आजपर्यंत २९१ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत २९ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (अॅक्टीव्ह) रूग्ण संख्या ६८ असल्याची माहिती तालुका आरोग्य डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.
येवल्यातील १३ अहवाल पॉझीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 01:41 IST
लोकमत न्युज नेटवर्क येवला : शहरासह तालुक्यातील १३ संशयीतांचे कोरोना अहवाल बुधवारी (दि. २) पॉझीटीव्ह आले आहेत. तालुक्यातील नगरसूल येथील ६५ वर्षीय वृध्दाचा नाशिक येथे जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर होम आयसोलशनमध्ये असणारे १० बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.
येवल्यातील १३ अहवाल पॉझीटीव्ह
ठळक मुद्देएका बाधिताचा मृत्यू; १० कोरोनामुक्त