शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

१३ ठराव संमत, महसूल अधिकाऱ्यांची ‘दांडी’

By admin | Updated: February 17, 2016 23:36 IST

योगेश घोलप : अपूर्ण पाणीपुरवठा योजनांच्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा

नाशिक : गेल्या सहा ते आठ वर्षांपासून अपूर्ण असलेल्या तालुक्यातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, तसेच महसूल विभागाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळवावे, अशा सूचना आमदार योगेश घोलप यांनी तालुक्यातील पहिल्याच आमसभेत दिल्या.नाशिक तालुका पंचायत समितीच्या आवारात काल (दि. १७) आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या आमसभेत तेरा विविध ठराव संमत करण्यात आले. तसेच ३३ निवेदनांचा आणि प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सरपंच व ग्रामस्थांच्या तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला. आमसभेस माजी आमदार बबनराव घोलप, पंचायत समिती सभापती मंदाबाई निकम, उपसभापती अनिल ढिकले, जिल्हा परिषद सदस्य अलका साळुंखे, पंचायत समिती सदस्य प्रकाश बदादे, सुजाता रूपवते, धनाजी पाटील, शोभा लोहकरे, सुशीला वाघेले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगन आगळे, तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक व पंचायत समिती अंतर्गत कार्यरत कर्मचारी उपस्थित होते. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या सभेत ग्रामस्थांच्या तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला. तसेच तेरा विविध प्रकारचे ठराव संमत करण्यात आले. ३३ निवेदने ग्रामस्थांनी दिले. यावेळी उपसभापती अनिल ढिकले यांनी दलित वस्तीचे प्रस्ताव जिल्हा परिषद स्तरावरून मंजूर होत नाही. आणेवारी चुकीच्या पद्धतीने झाली. अपूर्ण पाणीपुरवठा योजना असलेल्या ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सहा वर्षांपासून होत नाही, यासह तक्रारींचा पाढा वाचला. आमदार योगेश घोलप यांनी सांगितले की, ही पहिलीच आमसभा आहे. महसूलसह काही विभागांचे अधिकारी या सभेला अनुपस्थित राहिले. याबाबत त्यांच्या वरिष्ठांना कळवा, महसूलच्या अनेक तक्रारी असल्याने अधिकाऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहणे आवश्यक होते. नागरिकांची एकवेळ कामे नाही झाली तरी चालेल मात्र त्यांच्या प्रश्नांबाबत योग्य ते मार्गदर्शन त्यांना सरकारी कार्यालयातून दिले गेले पाहिजे. यापुढे नागरिकांच्या प्रत्येक समस्या आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दर पंधरा दिवसांनी गटविकास अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)