शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

शोधमोहिमेत आढळली १२६८ शाळाबाह्य मुले

By admin | Updated: August 27, 2016 22:28 IST

अ‍ॅपमार्फत नोंदणी : उद्यापासून देणार शाळांमध्ये प्रवेश

नाशिक : टाटा कन्स्ल्टंट सर्व्हिसेसच्या ‘डिस्क’ इनोव्हेशन सेंटरमधील तिघा विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून नोंद घेत मनपा शिक्षण मंडळाच्या सुमारे १५० शिक्षकांनी मागील आठवड्यात राबविलेल्या शोधमोहिमेत शहरात १२६८ शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत. या मुलांना आता मनपा शाळांमध्ये येत्या सोमवारपासून (दि.२९) प्रवेश देण्याची प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली.टाटा कन्स्ल्टंट सर्व्हिसेसच्या इनोव्हेशन सेंटरमधील कलम टीमच्या अपर्णा घटे, कनक जेटली आणि श्याम किशोर यांनी शाळाबाह्य मुले शोधून त्यांची नोंद घेणारे मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे. सदर अ‍ॅपमार्फत प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर जून महिन्यात ‘चाकं शिक्षणाची’ या संस्थेमार्फत ४३१ शाळाबाह्य मुले शोधण्यात आली होती आणि त्यातील २०० हून अधिक मुलांना विविध शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात आला होता. त्यानंतर दुसरा टप्पा मनपा शिक्षण मंडळामार्फत मागील आठवड्यात राबविण्यात आला. त्यासाठी मनपा शिक्षण मंडळातील विविध शाळांमधील अ‍ॅण्ड्राइड मोबाइल हाताळू शकणाऱ्या १५० शिक्षकांची निवड करण्यात आली होती. ज्या ठिकाणी शाळाबाह्य मुलांची संख्या अधिक असू शकेल अशी १८ ठिकाणे निश्चित करण्यात येऊन तेथे सदर शिक्षक जाऊन पोहोचले आणि शाळाबाह्य मुलांची माहिती संकलित केली. सदर मोहिमेत १२६८ मुले शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आले. संकलित केलेल्या माहितीनुसार आता शाळा परिसरनिहाय मुलांची नोंद घेण्यात आली असून, त्यांना दि. २९ आॅगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत जवळच्या शाळेत प्रवेश देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. सदर मुलांची माहिती त्या-त्या शाळांचे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांना पाठविण्यात आली आहे. त्यांनी सदर मुलांची शाळा प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यानंतर दि. २ ते ४ सप्टेंबर या कालावधीत किती मुलांनी शाळेत प्रवेश घेतला, परंतु शाळेत आले नाहीत याबाबतचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती नितीन उपासनी यांनी दिली. (प्रतिनिधी)