शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
3
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
4
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
5
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
6
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
7
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
8
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
9
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
10
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
11
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
12
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
13
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
14
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
15
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
16
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
17
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
18
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
19
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
20
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट

येवल्यात सेमी इंग्रजीच्या १२५ शाळा

By admin | Updated: July 26, 2016 22:26 IST

येवल्यात सेमी इंग्रजीच्या १२५ शाळा

येवला : माहिती-तंत्रज्ञान, भौतिक सोयीसुविधा, पालकांचा मराठी माध्यमाकडील ओढा, गुणवत्ता यासारख्या अनेकविध सोयीसुविधांच्या तुलनेत मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडू लागल्या होत्या. अशा परिस्थितीत येवला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे १२५ प्राथमिक शाळांनी कात टाकत या शाळेचे सेमी इंग्रजीत रूपांतर करून इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या ओढीला लगाम घालण्यात यश मिळविले आहे. गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांचे कुशल प्रशासन आणि जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांच्यासह शिक्षण विभागाचे अथक परिश्रम यातून येवला तालुक्याने जिल्ह्यात अव्वल क्रमांकाच्या जवळपास १२५च्या वर मराठी शाळांमधून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले आहेत. गुणवत्तेकडे लक्ष देऊन प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमात एक प्रकारची भरच घातली आहे. स्वामी मुक्तानंद विद्यालयात गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सेमी इंग्रजीच्या शाळा सुरू केलेल्या तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना निमंत्रित करु न आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सेमी इंग्रजीच्या शाळांच्या इयत्ता पहिलीचा ३० ते ५० पटावरील शाळांचा पुस्तके व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गायकवाड होते. ते म्हणाले की, हे सर्व शिक्षकांचे यश असून, मोफत सोयीसुविधा, सोशल मीडियाचा वापर, माहिती-तंत्रज्ञानाची जोड, गुणवत्तेत वाढ या बाबींनी हे यश मिळाले असून, आता गुणवत्तेवर अधिक भर देऊन भविष्यात मराठी माध्यमाच्या शाळांमधून सुसंस्कृत व मूल्यआधारित शिक्षण देण्याची गरज आहे व ते मिळवून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले व ही जबाबदारी शिक्षक पार पाडतील, असा विश्वासही व्यक्त केला. मूल्यशिक्षणाची खाण म्हणजे मराठी माध्यमांचा शाळा आहेत. स्थानिक ठिकाणीच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांनी उचलावी व पालकांनीही मराठी माध्यमांच्या शाळांची कास धरावी. सेमी शिक्षणाने पाल्याचा सर्वागीण विकास होईल, असा आशावादही त्यांनी बोलून दाखविला.गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांनी सांगितले की, लोकसहभागातून अनेक शाळा डिजिटल होत आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा वापरही वाढत आहे. घटत्या पटसंख्येला आळा घालून सेमी इंग्रजीचा पर्याय पुढे आणून सेमीमुळे पटसंख्येत वाढ झाल्याचे आढळून आले. इयत्ता पहिलीचा मागील वर्षाचा पट ३५९७ होता, यावर्षी त्यात वाढ झाली असून, अधिक सुधारणा दिसून आली आहे. स्पर्धेच्या युगात प्राथमिक शिक्षकांनी गुणवत्तेकडे लक्ष पुरवून पुन्हा आपल्या मराठी शाळांना सुगीचे दिवस आणावेत, असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की आजही एमपीएससी, यूपीएससीतील यशात ५०टक्केच्या आसपास विद्यार्थी मराठी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेतल्याचे दिसून येत आहे. मराठी माध्यमाच्या शाळांना गौरवाचे स्थान मिळवून देण्याचेही आवाहन केले त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभीच शैक्षणिक वर्षाचा आढावा घेऊन संबंधित मुख्याध्यापकांचा गौरव करण्यात आला. (वार्ताहर)