शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव प्रकरणी १२ जणांना हजेरीतून सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:30 IST

आठ महिन्यांपूर्वी नांदगाव येथील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी महसूल अधिकाºयांसह २३ शेतकºयांवर गुन्हा दाखल करण्याची घाई करणाºया लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपींची साधी चौकशी अथवा गुन्ह्याचा तपासही न केल्यामुळे उच्च न्यायालयाने बारा शेतकºयांची हजेरीतून सुटका केली आहे.

नाशिक : आठ महिन्यांपूर्वी नांदगाव येथील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी महसूल अधिकाºयांसह २३ शेतकºयांवर गुन्हा दाखल करण्याची घाई करणाºया लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपींची साधी चौकशी अथवा गुन्ह्याचा तपासही न केल्यामुळे उच्च न्यायालयाने बारा शेतकºयांची हजेरीतून सुटका केली आहे.दि. ५ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तींच्या जमिनींना खरेदी-विक्रीची अनुमती दिल्याने शासनाच्या चार कोटी रुपयांचे नुकसान करून सदर रकमेचा अपहार केल्याप्रकरणी नांदगावचे तत्कालीन तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी व जमिनीचे मालक शेतकरी अशा २३ जणांवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्णात सर्वच संशयितांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळविला व नंतर न्यायालयाने तो कायमही केला. तथापि, या सर्व संशयितांना दर सोमवारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात हजेरी लावून त्यांना तपास व चौकशीत सहकार्य करण्याची अट टाकली होती. परंतु गेल्या आठ महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने या गुन्ह्णाचा पुढे तपास केला नाही की, संशयितांची साधी विचारपूसही केली नाही. त्यामुळे अ‍ॅड. शिवाजी सानप, प्रशांत सानप यांच्यासह १२ शेतकºयांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन हजेरीतून सूट मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदूला भाटकर यांच्यासमोर या अर्जाची सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी या गुन्ह्णातील फिर्यादी व लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस निरीक्षक हेमंत भामरे हेदेखील उपस्थित होते. न्यायालयाने त्यांना दोषारोप दाखल केले काय, अशी विचारणा केल्यावर त्यांनी नकार दिला. त्यावर न्यायालयाने वादींचा अर्ज मंजूर करीत असल्याचे तोंडी सांगितले व तुमची काही हरकत आहे काय, असे विचारले असता भामरे यांनी नकार दिला. त्यामुळे न्यायालयाने अ‍ॅड. शिवाजी सानप, हेमंत सानप, जयंतीभाई पटेल, भावीन पटेल, अर्जुन माकानी, शिवलाल माकांनी, विनोद माकांनी यांच्यासह १२ जणांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात हजेरी लावण्यापासून सूट दिली दिली आहे.