शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

फायनान्स कंपनीतून १२ लाखांची लूट

By admin | Updated: November 27, 2015 22:51 IST

फायनान्स कंपनीतून १२ लाखांची लूट

सिडको : येथील राणेनगर भागात असलेल्या एका फायनान्स कंपनीतील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने मित्राच्या मदतीने कंपनीच्या लॉकरमधील सुमारे १२ लाखांची रोकड लंपास केली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी दोघा भामट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन चारचाकी गाड्या, महागडे मोबाइल व ७० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिडकोतील राणेनगर भागात इक्वि टॉस मायक्रो फायनान्स कंपनीची शाखा आहे. या शाखेत सचिन टेकाळे (२२, रा. रथचक्र सोसायटी, इंदिरानगर) हा कामाला होता. कार्यालय उघडण्याचे व बंद करण्याचे काम संशयित सचिन हा करीत होता. यामुळे साहजिकच कार्यालयाच्या चाव्यादेखील त्याच्याकडेच असत. कंपनीच्या लॉकरमध्ये १२ लाख रुपयांची रोकड असल्याचे सचिनला माहीत होते. सदरची रोकड लंपास करायची असा विचार सचिनच्या डोक्यात आला. यामुळे त्याने याबाबत त्याचा मित्र अतुल बापूराव निकम (२१, रा. फ्लोरा टाउन अंबड) यास सांगितले. अतुलनेही यास दुजोरा देत लॉकरमधील रोकड लंपास करण्याबाबत सचिनला होकार दिला. यानंतर हे दोघेही रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास कंपनीत आले व कंपनीच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या ओरिजिनल चाव्या घेऊन लॉकरमधील १२ लाख ६६ हजार रुपयांची रोकड लंपास केली. कंपनीच्या लॉकरमधून १२ लाखांची रोकड लंपास झाल्यानंतर सदरची चोरी ही कंपनीतील कर्मचाऱ्याकडूनच झाली असल्याचा अंदाज कंपनीच्या व्यवस्थापक सोनल साखळे यांना आला होता. त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, रोकड लंपास केल्यानंतर संशयित सचिन व अतुल या दोघांनी या पैशातून स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एमएच ०६-एटी ८०५५ व व्हेस्टा गाडी क्रमांक एमएच ०६-एडब्ल्यू-६५०७ या दोन चारचाकी गाड्या विकत घेतल्या. तसेच महागडे मोबाइलही घेऊन मौजमजा करण्यास सुरुवात केली. परंतु सातपूरच्या चाणाक्ष असलेल्या पोलिसांच्या ही बाब लक्षात आली.