शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

१२ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल

By admin | Updated: June 17, 2017 00:09 IST

नांदूरशिंगोटे : आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत सिन्नर तालुक्यात मुदत संपणाऱ्या १२ ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरशिंगोटे : आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत सिन्नर तालुक्यात मुदत संपणाऱ्या १२ ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. प्रभाग रचनेसाठी तहसील कार्यालयाकडून सात अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गूगल मॅपद्वारे यावेळेस प्रभाग रचना केली जाणार असल्याचे समजते. फेब्रवारी महिन्यात तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी पाहण्यास मिळणार आहे. आॅक्टोबर २०१७ ते फेबु्रवारी २०१८ या कालावधीत बारा ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. ग्रामपंचायतीच्या प्रभागरचनेसाठी तहसील कार्यालयाकडून दोन ग्रामपंचायत मिळून एक अध्यासी अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. त्यांना त्या गावातील ग्रामसेवक व तलाठी या कामी मदत करणार आहेत. सन २०११ ची जनगणना ग्राह्य धरून प्रभाग व आरक्षण काढले जाणार आहे. अनुसूचित जाती व जमातींचे आरक्षण संबंधित गावातील ग्रामसेवक व तलाठी हे स्थळ पाहणी करून निश्चित करणार आहेत. प्रभाग रचनेनंतर अनुसूचित जाती जमाती व नागरिकांना मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. अध्यासी अधिकाऱ्यांनी संबंधित गावात २७ जूनच्या आत विशेष सभा घेऊन त्यांचा अहवाल तहसील कार्यालयाकडे जमा करायचा आहे. तलाठी व ग्रामसेवक यांना गावात दवंडी देऊन याची ग्रामस्थांना माहिती द्यावयाची आहे. प्रभाग रचनेनंतर हरकती व सूचना मागविण्यासाठी ४ जुलै २०१७ रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हरकती सादर करण्यासाठी ११ जुलै २०१७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या हरकती व सूचना १५ जुलैपर्यंत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यावर निर्णय घेऊन अंतिम निर्णयासाठी २५ जुलै रोजी हरकतींचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासणीनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे ३१ जुलै रोजी प्रभागरचना व आरक्षणास अंतिम मान्यता देण्यात येणार आहे. अंतिम प्रभागरचना ३ आॅगस्ट २०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.