नाशिक : खोटी कागदपत्रे सादर करून कंपनीची १ कोटी ९३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मॉडेल कॉलनीतील सूर्यछाया सोसायटी येथे मॅग्मा फिनफार्म लि़ कंपनीचे कार्यालय असून, या ठिकाणी कंपनीकडून सॉईल कॉम्प्युटर व रॉक ब्रेकर मशीन घेण्यासाठी १ कोटी ९३ लाख ४६ हजार रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते़ मात्र संशयितांनी मशीन न घेता सदर रक्कम आपसात वाटून घेत अपहार केला़ ही घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली़ या प्रकरणी १२ संशयितांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
दोन कोटींच्या फसवणूक प्रकरणी १२ जणांवर गुन्हा
By admin | Updated: January 15, 2015 23:52 IST