शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

निफाड तालुक्यातील ११ गावांना ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा

By admin | Updated: July 17, 2016 01:17 IST

निफाड तालुक्यातील ११ गावांना ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा

निफाड : तालुक्यात धार्मिक व पौराणिक संदर्भ असलेल्या ११ गावांचा ‘क’ वर्ग पर्यटनस्थळात समावेश करण्यात आला आला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली आहे.निफाड तालुक्यातील करंजगाव येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर, खेडेचे हिंगलाज देवीमाता मंदिर, म्हाळसाकोरेचे म्हाळसादेवी मंदिर, शिवडीचे श्रीराम मंदिर, नांदुर्डीचे वरदविनायक गणपती मंदिर, साकोरे मिगचे खंडेराव महाराज मंदिर, मौजे सुकेणेचे दत्तमंदिर, चाटोरीचे शनि मंदिर, कोठुरेचे बाणेश्वर मंदिर, भुसेचे म्हसोबा महाराज मंदिर, पालखेडचे खंडेराव महाराज मंदिर आदि मंदिराचा यात समावेश आहे. या तीर्थस्थळी व यात्रोत्सवास दरवर्षी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. मात्र यात्रोत्सवाला होणाऱ्या गर्दीच्या तुलनेत सोयी सुविधा मिळत नाहीत. या गावांना शासनाच्या ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात यावा, शासनाच्या माध्यमातून विविध विकासयोजना राबविल्या जाव्यात, याकरिता संबंधित गावातील ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव करून त्याबाबत जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर केला होता. त्यास आमदार अनिल कदम यांनी विशेष शिफारस करून सदर गावे ‘क’वर्ग पर्यटन स्थळात समाविष्ट करणेबाबत पाठपुरावा केला. त्यानुसार आमदार अनिल कदमांनी जिल्हा नियोजन मंडळाकडे पालकमंत्री गिरीश महाजनांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत सदर गावे ‘क’ वर्ग पर्यटन स्थळ म्हणून समाविष्ट करावित असा ठराव मांडला. त्यास नियोजन मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते मान्यता देण्यात आली. निफाड तालुक्यातील अकरा गावांचा ‘क’ वर्ग पर्यटन स्थळ म्हणून समावेश करण्यात आला आहे. यामुळे या धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.(वार्ताहर)