पेठ : शहराच्या नजिक आरटीओ चेकनाक्याजवळ रिक्षा व मोटारसायकलच्या झालेल्या अपघातात जवळपास अकरा प्रवासी जखमी झाले असून, पैकी तिघांना अत्यवस्थ स्थितीत नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे़सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पेठहून खडकाचा पाडाकडे जाणारी रिक्षा (क्रमांक एमएच १५ वाय-११३६ आणि मोटारसायकल (क्रमांक एमएच १५ बीवाय-८०७१ यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने रिक्षामधील प्रवासी रस्त्याच्या कडेला फेकले गेले, तर मोटारसायकलचा पुढचा भाग निकामी झाला़पेठ येथे सध्या होळीची यात्रा सुरू असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असून, अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती़ जखमींना तत्काळ पेठच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़ यासंदर्भात पेठ पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस निरीक्षक व्ही़ डी़ ससे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत़जखमींचा नावे अशी- बुधा हरी पवार, हौसा हरी पवार, सागर हरी पवार, दिलीप संजय प्रधान, मनोज अशोक वाघ, वामन पोटिंदे, जयराम तुळशिराम पवार, पांडू लहानू शिंगाडे, चिमणीबाई रावजी डगळे, नीलेश रामदास कोरडे, उमी बुधा पवाऱ
रिक्षा-मोटारसायकल अपघातात ११ जखमी
By admin | Updated: March 3, 2015 00:51 IST