शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

११ ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:11 IST

माहे नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. जिल्ह्यातील १७३ तर मालेगाव तालुक्यातून ११ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत.

दाभाडी : माहे नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. जिल्ह्यातील १७३ तर मालेगाव तालुक्यातून ११ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. यासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ग्रामीण भागात निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.राज्य निवडणूक आयोगाने दोन टप्प्यात निवडणूक घेण्याचे जाहीर केले. नाशिक जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे. यासाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. पहिल्यांदाच ग्रामपंचायत सदस्यांबरोबर सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यात येणार आहे.थेट सरपंच निवडीबाबत मतदारांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा रंगल्या असून, गावपातळीवरील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे थेट सरपंच पदासाठी निवडणूक लढविणाºया उमेदवाराला राजकीय पक्षाचे चिन्ह मिळणार नसून आयोगाने निश्चित केलेल्या मुक्त चिन्हातून प्रथमत: कोणतेही एक निवडणूक चिन्ह मिळणार आहे. या निवडणुकीपासून सरपंचाला सर्वाधिक अधिकार व पहिल्यांदाच थेट जनतेतून निवड असल्याने गाव कट्ट्यावर अनेक चर्चेला उधाण आले आहे. या निवडणुकीत मतदाराला कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त चार मते द्यावी लागणार आहेत. सरपंचपदासाठी मतपत्रिकेचा रंग फिका निळा असेल, तर सदस्यांसाठी पूर्वीप्रमाणे अनुसूचित जातीसाठी फिका गुलाबी, अनुसूचित जमातीसाठी फिका हिरवा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी फिका पिवळा, तर सर्वसाधारण जागेसाठी पांढरा रंग असणार आहे.