शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

१०६ अहवाल निगेटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:14 IST

नाशिक : मालेगावमध्ये बुधवारी दोन कोरोनाबाधितांचे निधन झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. दरम्यान, बुधवारच्या दिवसभरात एकूण १०६ अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

नाशिक : मालेगावमध्ये बुधवारी दोन कोरोनाबाधितांचे निधन झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. दरम्यान, बुधवारच्या दिवसभरात एकूण १०६ अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच मालेगावमध्ये पूर्वीच बाधित होऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १० रुग्णांचा पहिला फेरतपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने मालेगावमधूनदेखील काही रुग्ण कोरोनामुक्त होऊन परतण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.बुधवारी निगेटिव्ह आलेल्या १०६ अहवालांमध्ये मालेगावचे ९७, जिल्हा रुग्णालयाचे ५, मनपाच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलचे ३ तर खासगी रुग्णालयातील एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे बुधवारचा दिवस अहवालांच्या बाबतीत काहीसा दिलासादायक ठरला. त्याशिवाय निगेटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये मालेगावी उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १० रुग्णांचा पहिला फेरतपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने ते रुग्ण कोरोनामुक्त होण्याची शक्यता असून, त्याबाबतचा निर्णय त्यांचा दुसरा फेरतपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच जाहीर केला जाणार आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांमध्ये मालेगावची रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण भयावह असून, त्या संख्येला रोखण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयास केले जात आहेत. तरीदेखील मालेगावमध्ये दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. मालेगावमध्ये केवळ आठ क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. ते सर्व परिसर पूर्णपणे सील केले असतानाही आता त्या क्षेत्राबाहेर रु ग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राची संख्या १८ वर पोहोचली असून, त्यात दिवसागणिक भर पडत आहे. नजीकच्या भविष्यात मालेगावमध्ये बाधित रुग्ण नसलेला मिळणे मुश्कील बनणार असल्यासारखी स्थिती उत्पन्न होते काय? अशी स्थिती आहे. त्यामध्ये शहरातील संगमेश्वर, मोतीबाग नाका, संजय गांधीनगर, जाधवनगर, मोमीनपुरा, दातारनगर, जुना आझादनगर, जुना इस्लामपुरा, भायखळा झोपडपट्टी या भागाचा समावेश आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या सोबतच आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे. तरीदेखील कोरोना कमी होण्याचे नाव घेत नसल्याने आरोग्य यंत्रणादेखील पुरती जेरीस आली असूनही जिवावर उदार होऊन कार्यरत आहे.------शहरातील नऊ अहवाल निगेटिव्हमालेगावमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याचे प्रमाण मोठे असले तरी नाशिक शहरामध्ये मात्र बाधितांची संख्या दहावर कायम आहे. दरम्यान, बुधवारी शहरातील नऊ अहवाल प्राप्त झाले असून, ते सर्वच्या सर्व निगेटिव्ह आहेत. त्यात जिल्हा रुग्णालयातील ५, मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील ३, तर खासगी रुग्णालयातील एका रुग्णाचा समावेश आहे. महानगरातील बाधित संख्या न वाढल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक