शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

जिल्ह्यात पुन्हा आढळले १ हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 00:52 IST

नाशिक : जिल्ह्याची बाधितांची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. रविवारी (दि.६) जिल्ह्यात रुग्ण वाढल्याचे दिसून आले. दिवसभरात १ हजार १७४ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४३ हजार ६९० इतकी झाली आहे. १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ९३३ झाला आहे. दिवसभरात ९३१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

ठळक मुद्दे१२ बळी : बाधितांचा आकडा सरकला ४३ हजारांच्या पुढे

नाशिक : जिल्ह्याची बाधितांची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. रविवारी (दि.६) जिल्ह्यात रुग्ण वाढल्याचे दिसून आले. दिवसभरात १ हजार १७४ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४३ हजार ६९० इतकी झाली आहे. १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ९३३ झाला आहे. दिवसभरात ९३१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.सण-उत्सवांचा काळात शहरासह जिल्ह्यात अचानकपणे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. दिवसभरात जिल्ह्यात १ हजार २७२ संशयित रु ग्ण विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल झाले आहेत.

नाशिक ग्रामीणच्या तुलनेत शहरात स्थिती अधिक कठीण होत चालली आहे. रविवारी शहरात ७६८, तर ग्रामीण भागात ३५१ आणि मालेगावात ५३ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात १२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात ८ नाशिक शहरातील, ग्रामीणमध्ये ३ व मालेगावातील १ रुग्णाचा समावेश आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी झाली होती.दीडशे ते पावणेदोनशेच्या पटीत रुग्ण आढळून येत होते; मात्र रविवारी पुन्हा रुग्णसंख्या साडेतीनशेपर्यंत जाऊन पोहोचली. एकूणच शहरासह जिल्ह्यातही कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने गाव, तालुका पातळीवरसुद्धा सतर्कता बाळगण्याची गरज आहे.यापैकी १ हजार ८५ रु ग्ण शहरातील आहेत. शहरात संशयित रु ग्णांसह कोरोना रु ग्णांची संख्या वाढू लागली असून, यामुळे नागरिकांनी शहरात वावरताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहराची परिस्थिती गंभीरजिल्ह्यात आतापर्यंत ३५ हजार ६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ७ हजार ६९१ रुग्ण उपचार घेत आहेत. १ हजार ५३७ रुग्णांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण १ लाख ४६ हजार ३६६ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल