शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

100 क्ंिवटल तूर पडून

By admin | Updated: March 10, 2017 01:14 IST

येवला : बारदानाअभावी तूर खरेदी बंद करण्यात आल्याने तालुक्यातील चार गावांतील शेतकऱ्यांना सुमारे १०० क्विंटल तूर माघारी न्यावी लागली.

 येवला : बारदानाअभावी तूर खरेदी बंद करण्यात आल्याने तालुक्यातील चार गावांतील शेतकऱ्यांना सुमारे १०० क्विंटल तूर माघारी न्यावी लागली. शासन व नाफेडने बारदान त्वरित उपलब्ध करून द्यावे व तूर खरेदी पूर्ववत सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.कडधान्यवाढीसाठी शासनाने विशेष योजना राबविल्याने तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. तुरीचा साठा करणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी कमी दरात तूर विक्री सुरू केली होती. परंतु शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या हेतूने शासनाने नाफेड आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने हमीभावाने तूर खरेदी केंद्र येवल्यात सुरू केले आहे. हे केंद्र सुरू होऊन महिना झाला. नाफेड आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्या वतीने येवला तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ येथे ५०५० रुपये प्रति क्विंटल स्थिर भावाने ६ फेब्रुवारीला तूर खरेदी सुरू करून महिना झाला. गेल्या महिनाभरात ५०५० रु पये प्रतिक्विंटल दराने १७८५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.भाव स्थिरता योजनेअंतर्गत तूर खरेदी करण्यास नाफेडद्वारा येवला तालुका खरेदी-विक्री संघाला पुरवलेले ३८०० किलो बारदानांपैकी ३५७० किलो बारदान महिनाभारत वापरला गेले. उरलेले बारदान फाटके असल्याने ते वापरता येत नाही. त्यामुळे बारदानाअभावी तूर खरेदी करणे शक्य नसल्याचे खरेदी- विक्री संघाचे व्यवस्थापक बाबासाहेब जाधव यांनी सांगितले. तूर खरेदी पूर्ववत चालू व्हावी यासाठी नाफेडने बारदान त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.