शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार विद्यार्थी फिरकलेच नाहीत

By admin | Updated: July 13, 2017 00:34 IST

अकरावी प्रवेश : दुसऱ्या दिवसापर्यंत केवळ चार हजार प्रवेश; आज अखेरची संधी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : इयत्ता अकरावी प्रवेशाची सुमारे १४ हजार विद्यार्थ्यांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्यापही १० हजार विद्यार्थी महाविद्यालयाकडे फिरकलेही नाहीत. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीसाठी महाविद्यालये अलॉट झाले असतानाही दोन दिवसात केवळ ४ हजार ३६२ इतकेच प्रवेश शहरातील महाविद्यालयांमध्ये होऊ शकले आहेत. अकरावीच्या प्रवेशाला उडणारी झुंबड यंदा आॅनलाइन प्रक्रियेमुळे दिसत नसली तरी प्रवेशासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात आल्याने तीन दिवसात पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईल असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. विज्ञान शाखेच्या ६४५४ जागांसाठी ४३७३ इतक्या विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलॉट झाली होती; मात्र अद्याप केवळ २०७२ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले आहेत. वाणिज्य शाखेतही अशीच परिस्थिती असून, २२९१ पैकी केवळ ७७२ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी उत्सुकता दाखविली आहे. कला शाखेतील प्रवेश मात्र तीन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दोन दिवसातच ९० टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत; मात्र वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या बाबतीत अजूनही विद्यार्थी पसंतीच्या कॉलेजच्याच प्रतीक्षेत आहेत. पहिल्या पसंतीच्या विद्यार्थ्यांनीदेखील अद्याप प्रवेशाची घाई केलेली नाही. गुरुवारी प्रवेशाचा अखेरचा दिवस असल्याने प्रथम पसंतीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावाच लागणार आहे. दुसऱ्या पसंतीलाही महत्त्वाचे कॉलेज मिळणे शक्यआपल्या आवडीचे महाविद्यालय पहिल्या पसंतीस न मिळाल्याने हिरमोड झालेल्या विद्यार्थ्यांना कदाचित दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय म्हणून त्यांना प्रवेश मिळू शकतो, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. ज्या मोठ्या आणि महत्त्वाच्या महाविद्यालयांमध्ये गर्दी कमी दिसते, त्यामध्ये यापूर्वीच २५ टक्के इनहाउस आणि मॅनेजमेंट कोट्याचे प्रवेश झाले आहेत. या जागा आणि पहिल्या पसंतीचे प्रवेश होऊन काही जागा विद्यार्थ्यांना मिळू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेल्या पसंतीक्रम २ ते २० मधील कनिष्ठ महाविद्यालय मिळाले असेल त्यांना दि. १५ तारखेपर्यंत पसंतीक्रम व शाखा बदलून पसंतीक्रम बदलण्याची सुविधा असेल.