शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

दहा जुगाºयांना अटक : नाशिकरोड, सातपूर याठिकाणी छापामारी जुगार अड्ड्यांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 1:05 AM

नाशिक : शहर पोलिसांनी शनिवारी (दि़३) अंबड, नाशिकरोड व सातपूर या तीन ठिकाणी छापामारी करून दहा जुगाºयांना ताब्यात घेतले

ठळक मुद्देरोख रकमेसह जुगाराचे साहित्य दोघांनाही ताब्यात घेतले

नाशिक : शहरातील विविध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, छापामारी सुरू केली आहे़ शहर पोलिसांनी शनिवारी (दि़३) अंबड, नाशिकरोड व सातपूर या तीन ठिकाणी छापामारी करून दहा जुगाºयांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून २१ हजार रुपयांच्या रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़ अंबड लिंकरोडवरील एऩ एम़ एंटरप्रायजेस दुकानाच्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार शुक्रवारी (दि़२) रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला़ त्यावेळी संशयित किरण संजय जाधव (२७, रा़हरी ओम रोह हाउस नंबर ४, साईविजय हॉटेलच्या पाठीमागे, साईग्राम, अंबड) व त्याचे सहा साथीदार हे पत्त्याच्या कॅटवर अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते़ पोलिसांनी या संशयितांकडून रोख रकमेसह २० हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त केले़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ एकलहरा गेटजवळील मोकळ्या जागेवर नाशिकरोड पोलिसांनी शनिवारी (दि़३) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास छापा टाकला़ या ठिकाणी संशयित दीपक रामा धोत्रे (३५) व एकनाथ बाबूराव बोराडे (५९, रा़ एकलहरा गेट, सामनगावरोड, नाशिकरोड) हे स्वत:च्या फायद्यासाठी कल्याण बाजार नावाचा अंक आकड्यावर पैसे लावून व घेऊन मटका जुगार खेळताना व खेळविताना आढळून आले़ पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सातपूर परिसरात टाकला छापासातपूर परिसरातील कार्बन नाका परिसरात पोलिसांनी शनिवारी (दि़३) दुपारी छापा टाकला़ या ठिकाणी संशयित संजय रामलाल बागुल (४५, रा़द्वारकामाई अपार्टमेंट, धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर, सातपूर) हा जुगाराचे साहित्य व कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना व खेळविताना आढळून आला़ पोलिसांनी बागुल यास ताब्यात घेतले असून, त्याच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला़