शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ८ लाख मे. टन द्राक्षमाल पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 00:02 IST

कोरोनामुळे संपूर्ण भारतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला लॉकडाउन आणि निसर्गाने दिलेला दगा यामुळे राज्यात हंगामात तयार झालेला तब्बल ८ लाख मेट्रिक टन द्राक्षांचा साठा पडून आहे. त्यामुळे उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देराज्यातील स्थिती : कोरोनाच्या फटक्याने निर्यात अवघड; उत्पादक आर्थिक अडचणीत

नाशिक : कोरोनामुळे संपूर्ण भारतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला लॉकडाउन आणि निसर्गाने दिलेला दगा यामुळे राज्यात हंगामात तयार झालेला तब्बल ८ लाख मेट्रिक टन द्राक्षांचा साठा पडून आहे. त्यामुळे उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.द्राक्ष हंगाम बहरात असताना कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. सर्वत्र लॉकडाउन झाल्याने द्राक्ष निर्यात बंद झाली. याबाबत सातत्याने झालेली ओरड आणि बळीराजाचे होणारे नुकसान पाहता संचारबंदीच्या काळात शेतमाल वाहतुकीसाठी शासनाने परवानगी दिली असली तरी परराज्यात अनेक अडचणी उभ्या ठाकत असल्याने उत्पादकांवरील संकट कायम आहे. सद्य:स्थितीत उत्पादक वाराणसी, कोलकाता यासारख्या शहरात द्राक्ष निर्यातीचा प्रयत्न करत असले तरी, ‘पॅकिंग’साठी संबंधित ठिकाणी मजूरच मिळत नाही, तर अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनीहीपाठ फिरवल्याने माल पडून आहे. काही व्यापारी उत्साह दाखवितअसले तरी या ठिकाणी पोहोचेपर्यंतचा खर्च वसूल होणे जिकिरीचे आहे. शिवाय के्रटमध्ये असाच माल पडून राहिल्यास द्राक्षांचे मणी गळून पडण्याची भीती उत्पादकांनी व्यक्त केली आहे.निर्यातीचा हंगाम २० एप्रिलपर्यंत चालतो. या काळात राज्यभरातून सुमारे २००० कंटेनर इतका माल ठिकठिकाणी गेला असता, मात्र हंगामातच कोरोनाचे संकट उभे ठाकल्यामुळे आर्थिक नुकसान भरून काढणार कसे? असा प्रश्न उत्पादकांपुढे कायम आहे. त्यासाठी शासनानेच आता बळीराजाला न्याय देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.निसर्गानेही मारले...कोरोनाचे सावट कायम असताना राज्याच्या अनेक भागात गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार वादळाच्या तडाख्यासह अवकाळी पावसाने द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. शेतकऱ्यांचे लाखो रुपये डोळ्यांदेखत पाण्यात गेले. या दुहेरी संकटाचा सामना कसा करायचा, असा प्रश्न द्राक्ष उत्पादकांपुढे निर्माण झाला आहे.गावोगावी विक्रीची परवानगी द्या...शेतमाल वाहतुकीस शासनाने परवानगी दिली असली तरी निर्यातीचे संकट कायम आहे. संचारबंदीच्या काळात शासनाने द्राक्ष उत्पादकांना विशेष पास देऊन गावोगावी द्राक्ष विकता येतील अशी व्यवस्था करावी. त्यामुळे काहीसे नुकसान टाळता येईल, अशी मागणी निर्यातदार मधुकर ढोमसे यांनी केली आहे.कोरोना आणि निसर्गाच्या फटक्याने ‘मार्च एण्ड’नंतर बळीराजाचाच ‘एण्ड’ होतो का? अशी भीती निर्माण झाली आहे. शासनाने आता महत्त्वाचा घटक समजल्या जाणाºया बळीराजाला हजारात मदत न करता लाखात मदत करून उभारी देणे अंत्यत महत्त्वाचे आहे.-जगन्नाथ खापरे, अध्यक्ष, राज्य बागायतदार संघटना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAgriculture Sectorशेती क्षेत्र