शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यातून १ लाख २० हजारांचा मुद्देमाल चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:13 IST

---------------------- विवाहितेचा छळ; पतीसह सातजणांविरुद्ध गुन्हा मालेगाव : वाहन घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, म्हणून शारीरिक व मानसिक ...

----------------------

विवाहितेचा छळ; पतीसह सातजणांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : वाहन घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, म्हणून शारीरिक व मानसिक छळ करणार्‍या पतीसह सातजणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सारिका किरण जाधव या विवाहितेने फिर्याद दिली आहे. पती किरण मधुकर जाधव व इतर सातजण (रा. वावी वेस, ता. सिन्नर) यांनी चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत म्हणून शारीरिक व मानसिक छळ केल्याचे सारिका यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार आहेर करत आहेत.

-----------------

विवाहितेचा छळ, चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

मालेगाव : चारित्र्याचा संशय घेऊन तसेच माहेरहून वीस लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह चारजणांविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फरहादीबा काजी रईसउद्दीन या विवाहितेने फिर्याद दिली आहे. काजीर रईसउद्दीन बशीरुद्दीन, बशीररुद्दीन बद्दरुद्दीन, सलमा बशीरुद्दीन, शाहिना बशीरुद्दीन यांनी छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

-------------------

लोखंडी गजने मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

मालेगाव : तालुक्यातील कंधाने येथे एकाला लोखंडी गजने गंभीर स्वरूपाची मारहाण करणाऱ्या विलास उर्फ बाळू सुभाष गावडे याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धनराज पोपट पवार यांनी फिर्याद दिली आहे. पवार यांना ‘तुझा भाऊ पोलिसात तक्रार का देतो’ अशी कुरापत काढून गावडे याने लाथाबुक्क्याने व लोखंडी गजाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील करत आहेत.

----------------

बेशुद्धावस्थेतील वृद्धाचा मृत्यू

मालेगाव : शहरातील हॉटेल मीनादजवळ बेशुद्धावस्थेत आढळलेल्या अनोळखी साठ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. या अनोळखी वृद्धाला पोलिसांनी उपचारार्थ सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या वृद्धाच्या अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट व हातावर गोंदलेले आहे. संबंधित मृताच्या नातेवाईकांनी शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन व्ही. ओ. वसावे यांनी केले आहे.