शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या निवडणुका लांबणीवर पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 12:50 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद अधिनियम दुरुस्तीचे विधेयक या विधानसभा अधिवेशनात चर्चेत आलेच नसल्याने ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद अधिनियम दुरुस्तीचे विधेयक या विधानसभा अधिवेशनात चर्चेत आलेच नसल्याने जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रिया रेंगाळणार आहे. त्यामुळे राज्यातील नंदुरबार, धुळेसह चारही जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणा:या 23 पंचायत समितींच्या निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. परिणामी याठिकाणी प्रशासक नियुक्तीची शक्यता वर्तवली जात आहे.राज्यातील नंदुरबार, धुळे, अकोला व वाशीम या चार जिल्हा परिषद तसेच त्याअंतर्गत येणा:या 23 पंचायत समितींची निवडणुकीची मुदत येत्या 30 डिसेंबरला पूर्ण होत आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महिनाभरापूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. तथापि, गट-गणांच्या आरक्षणाच्या मुद्यावरून काही याचिकाकर्ते न्यायालयात गेल्याने न्यायालयाने या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. शिवाय आरक्षणाच्या मुद्यावर राज्य शासनाकडून उत्तर मागवले आहे. त्यासाठी राज्य शासनाला जि.प. अधिनियमात दुरुस्ती करावी लागणार असून त्याकरिता विधानसभा अधिवेशनात हे दुरुस्ती विधेयक मंजूर करावे लागणार आहे. वास्तविक निवडणुकीची मुदत महिनाभरात संपणार असल्याने या हिवाळी अधिवेशात पहिल्याच आठवडय़ात या विधेयकावर चर्चा अपेक्षित होती. परंतु  ती झालीच नाही. यावरून राज्य शासनाचा मूढ निवडणुकांबाबत काहीसा सावध असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, विधेयक चर्चेत न आल्याने आता महिनाभरात सर्व प्रक्रिया होणे अवघड आहे. दुसरा मार्ग याबाबत राज्य शासन मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन अध्यादेश काढू शकते. परंतु हा अध्यादेश निघाला तरी न्यायालयात तो सादर करणे, त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे तो पाठवणे, पुन्हा नव्याने निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू होणे या सर्व बाबींसाठी विलंब लागणार असल्याचे स्पष्ट असल्याने आता 30 डिसेंबरपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका होणे अशक्य आहे. त्यामुळे या निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट असल्याने मुदत संपल्यानंतर राज्य शासन या जिल्हा परिषद व पंचायत समितींवर प्रशासक नेमते की त्यांना मुदतवाढ देते याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.निवडणुकीची मुदत संपणा:या जि.प. व एकूण जागा4नंदुरबार     एकूण जागा 554धुळे          एकूण जागा 564अकोला     एकूण जागा 564वाशीम      एकूण जागा 52पंचायत समित्यानंदुरबार- एकूण पंचायत समिती 6, जागा- 110धुळे- एकूण पंचायत समिती 4, जागा- 112अकोला- एकूण पंचायत समिती 7, जागा- 106वाशीम- एकूण पंचायत समिती 6, जागा- 104