शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.निवडणुकीची सेमी फायनल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 11:59 IST

ग्रामपंचायत निवडणूक : प्रथमच दिसून आली सर्वच ठिकाणी राजकीय चूरस

नंदुरबार : येत काही दिवसात जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पाश्र्वभुमीवर झालेल्या जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व सेनेनेही चांगलीच मेहनत घेतल्याचे दिसून आले. थेट सरपंचपदाची देखील निवडणूक असल्यामुळे जास्तीत जास्त गावांवर आपले वर्चस्व असावे यासाठी प्रय} झाले. स्थानिक प्रश्न आणि राजकारणावरच ही निवडणूक लढविली गेली. असे असले तरी काँग्रेस व भाजपने दावे-प्रतिदावे केले आहेत. जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतींसाठी बुधवारी मतदान झाले होते. त्याचा निकाल गुरुवारी लागला. अनेक ठिकाणी निकालाचे गणित चुकले तर काही ठिकाणी अपेक्षीत निकाल लागले. थेट सरपंच पदासाठी निवडणूक असल्यामुळे सर्वच ठिकाणी चुरस देखील दिसून आली. असे असले तरी माघारीच्या वेळीच जवळपास 12 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली होती. उवर्ररित 53 ग्रामपंचायतींसाठी बुधवारी चुरशीची निवडणूक झाली.जि.प. निवडणुकीची पाश्र्वभुमीया निवडणुकांना येत्या काळात जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या पाश्र्वभुमीवर झालेल्या या 66 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल बरेच काही सांगून गेले आहेत. जास्तीत जास्त गावे आपल्या ताब्यात असावे, आपले उमेदवार सरपंचपदी असावे यासाठी काँग्रेस, भाजपने आटापीटा चालविला होता. वरिष्ठ पातळीवरून देखील याकडे पाहिले गेले होते. कारण जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत चुरस राहणार असल्याने नेत्यांनीही ही निवडणूक गांभिर्याने घेतली होती. त्यामुळे निकाल लागताच दावे केले.प्रतिष्ठा पणालाथेट सरपंच पदाची निवडणूक असल्यामुळे अनेक स्थानिक नेते, पदाधिका:यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. गाव पातळीवर नाते-गोते, संबध आणि गावगाडा लक्षात घ्यावा लागतो. शिवाय एकाएका मताचे महत्त्व असते. ही बाब लक्षात घेता स्थानिक नेत्यांनी राजकीय दबाव तंत्राचा देखील काही ठिकाणी वापर केला. त्या माध्यमातून आपल्या गटातील, पक्षातील उमेदवारांना मतदान करण्यासाठी भावनिक आणि राजकीय डावपेचातून देखील आवाहन करण्यात आले होते.जल्लोष आणि उत्साहतहसील कार्यालयात सकाळी नऊ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. जसे निकाल बाहेर येत होते त्याप्रमाणे त्या त्या गावातील कार्यकर्ते मंडळी गुलाल उधळून जल्लोष करीत होती. गावागावात देखील जल्लोष करून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. पोलिसांनी संवेदनशील गावांवर लक्ष केंद्रीत केले होते. त्यामुळे निकालानंतर सायंकाळी उशीरार्पयत कुठेही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून गंभीर प्रसंग उद्भवला नाही.