शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. सदस्य आपल्या भागात सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 11:54 IST

मतांसाठी जोडणी : राष्टÑवादीचे अनेक सदस्य करताहेत भाजपचे काम

मनोज शेलार।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकसभा निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य देखील आपल्या भागात आपल्या उमेदवारांसाठी सक्रीय झाले आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेत निवडून आलेले बहुतेक जिल्हा परिषद सदस्य हे भाजपचे अर्थात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते असल्यामुळे ते भाजपचे काम करीत आहेत. मतदार संघात एकुण सदस्यांच्या तुलनेत सर्वाधिक अर्थात ४७ सदस्य काँग्रेसचे आहेत.नंदुरबार आणि धुळे जिल्हा परिषदेची निवडणूक २०१३ मध्ये झाली होती. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात लोकसभा निवडणूक लागल्यानंतर अनेक राजकीय उलथापालथी झाल्यात. ती परिस्थिती पाच वर्षात कायम राहिली. त्यामुळे निवडून दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर येणे व काम दुसºया पक्षासाठी करणे असे बहुतेक ठिकाणी बहुतांश नंदुरबार जिल्ह्यातील चित्र होते.नंदुरबार मतदार संघात एकुण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिरपूर तालुक्याचा देखील समावेश आहे. या सर्व भागात एकुण ८५ जिल्हा परिषद सदस्य आहेत. सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य हे साक्री तालुक्यात आहेत. त्या खालोखाल शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या येते.नंदुरबार जिल्ह्यात एकुण सदस्य संख्या ५५ इतकी आहे. त्यात २९ सदस्य हे काँग्रेस पक्षाचे तर २५ सदस्य राष्टÑवादीचे अर्थात आमदार डॉ.विजयकुमार गावीत गटाचे आहेत. केवळ एक सदस्य भाजपकडून निवडून आला होता. त्यांनी देखील राष्टÑवादीला अर्थात डॉ.गावीत गटाला साथ दिली होती. काँग्रेसचे सदस्य एकदिलाने आपल्या उमेदवारासाठी प्रयत्न करीत आहेत. अनेक ठिकाणी पक्षाने त्यांना जबाबदाºया देखील वाटून दिल्या आहेत.दुसरीकडे काँग्रेसचा घटक पक्ष असलेल्या राष्टÑवादीचे सदस्य अर्थात राष्टÑवादीच्या तिकीटावर निवडून आले तरी भाजपचे पर्यायाने आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचे समर्थक असलेले सदस्य भाजपचे काम करीत आहेत. त्यातील काही सदस्य नाराज असले तरी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न यापूर्वीच झाला आहे. त्यामुळे वरकरणी ते कामाला लागल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.साक्री व शिरपूर तालुक्यातील राष्टÑवादीचे सदस्य मात्र घटक पक्षाच्या कामाला लागल्याचे दिसून येत आहेत.शिवसेनेचा एक केवळ एक सदस्य मतदारसंघात आहे. ते देखील शिरपूर तालुक्यातील आहेत. व एक अपक्षा सदस्य असून त्यांची भुमिका स्पष्ट नसल्याचे चित्र आहे.