जिल्हा परिषदेचाच घसा पडला कोरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 12:00 IST
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामिण भागातील पाणी टंचाईचे नियोजन आणि उपाययोजना करणा:या जिल्हा परिषदेवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची ...
जिल्हा परिषदेचाच घसा पडला कोरडा
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामिण भागातील पाणी टंचाईचे नियोजन आणि उपाययोजना करणा:या जिल्हा परिषदेवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषद इमारत आणि वसाहतीला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पालिकेकडून मिटरने पाणी पुरवठा होत असला तरी वसाहतीला चार दिवसाआड पाणी येत असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेची इमारत टोकरतलाव रस्त्यावर आहे. हा भाग उजाड माळराणाचा आहे. त्यामुळे या भागातील जमिनीखालील पाण्याची पातळी खोल आहे. त्याचा फटका पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्यात होत आहे. दोन कुपनलिका आटल्याजिल्हा परिषद इमारत आणि वसाहतीला पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषद आवारात दोन कुपनलिका करण्यात आल्या आहेत. त्या देखील यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यातच कोरडय़ा झाल्या होत्या. जिल्हा परिषदेने पुन्हा दोन ठिकाणी नवीन कुपनलिका केल्या परंतु त्या देखील कोरडय़ा गेल्या. परिणामी पाण्याचे मोठे संकट जिल्हा परिषदेसमोर उभे ठाकले आहे. घरून आणावे लागते पाणीकर्मचा:यांना कामावर येतांना घरून पुरेसे पाणी आणावे लागत आहे. आणलेले पाणी दिवसभर पुरविण्याचे आव्हान कर्मचा:यांसमोर असते. त्यांच्याकडे कुणी काम घेवून आलेच तर त्यांना पाणी पाजण्याचीही दिक्कत अशा कर्मचा:यांना असते. काम घेवून येणारे अनेक अभ्यागत हे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या केबीनजवळील वॉटर फिल्टरजवळ जावून पाण्याची तहान भागवतात. तेथेही मर्यादा येत असल्याने ते ही काही वेळा बंद होते.वसाहतीला फटकाजिल्हा परिषद वसाहतीला पाणी टंचाईचा मोठा फटका बसत आहे. वसाहतीला पूर्वी चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. आता पालिकेचे पाणी घेतल्याने किमान दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. काही कर्मचारी खाजगी टँकर आणून पाण्याची गरज भागवत आहेत. पालिका आली धावून जिल्हा परिषदेच्या मदतीला पालिका धावून आली आहे. पालिकेने मिटरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे मान्य केल्याने गेल्या महिन्यापासून ब:यापैकी समस्या सुटली आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या जलकुंभाची साठवण क्षमता एक लाख लिटर इतकी आहे तर जिल्हा परिषदेला दररोज किमान दीड लाख लिटर पाणी लागते. त्यामुळे ही असमानता असल्यामुळे तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागत आहे. आता पालिकेने एक तासाऐवजी दीड तास पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केल्याने ब:यापैकी समस्या सुटण्यास मदत होत आहे. जिल्हा परिषद इमारत व पदाधिका:यांचे निवासस्थान या दरम्यान एक नाला गेला आहे. पावसाळ्यात या नाल्यातून ब:यापैकी पाणी वाहते. आता या नाल्यावर बांध घालून ते पाणी अडविण्याचे जिल्हा परिषदेने ठरविले आहे. जेणेकरून जमिनीत पाणी मुरल्यावर कुपनलिकेची पाणी पातळी ब:यापैकी टिकून राहू शकते. याशिवाय याच नाल्याच्या परिसरात एक किंवा दोन कुपनलिका केल्यास त्याचाही फायदा होऊ शकतो. त्यादृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.