शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणूकीची तयारी वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रशासनाकडून जिल्हा परिषद निवडणूकीच्या तयारीला वेग देण्यात आला असून गट व गणनिहाय मतदार याद्यांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रशासनाकडून जिल्हा परिषद निवडणूकीच्या तयारीला वेग देण्यात आला असून गट व गणनिहाय मतदार याद्यांचे विभाजन पूर्ण करण्यात आले आह़े विभाजित याद्या बुधवारी दुपारी निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहेत़  विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता संपल्याच्या दुस:याच दिवशी राज्य निवडणूक आयोगाने नंदुरबारसह राज्यातील चार जिल्हा परिषदेच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत मतदारयाद्यांचे विभाजन करण्याचे आदेश काढले होत़े यानुसार 30 ऑक्टोबर ही मुदत देण्यात आली आह़े जिल्ह्यात 56 जिल्हा परिषद गट आणि 112 पंचायत समिती गण यांचे आरक्षण काढण्यात आले आह़े याअनुषंगाने विधानसभा निवडणूक कार्यक्रमात अंतिम करण्यात आलेली 4 ऑक्टोबर रोजीची पुरवणी मतदार यादीच जिल्हा परिषदेसाठी अंतिम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े जिल्हा प्रशासनाकडून तालुकानिहाय आदेश देण्यात आल्यानंतर मतदार याद्या विभाजनाचे काम तहसील स्तरावर पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आह़े जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम येत्या महिन्यात लागू होण्याची शक्यता असल्याने तालुका स्तरावरुन प्रशासनाची तयारी सुरु झाल्याची माहिती देण्यात आली आह़े 

जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या आरक्षणाबाबत हरकती दाखल करण्यात आल्या होत्या़ यातील काही हरकती निकाली निघाल्याची माहिती आह़े परंतू नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत हरकत कायम असल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आह़े या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आह़े न्यायालयाने राज्यशासनाकडून नागरिकांच्या मागास प्रवर्गातील लोकसंख्येची माहिती मागितली होती़ शासनाकडून ही माहिती बुधवारी सादर झाल्यानंतर तात्काळ निवडणूका घोषित होण्याची शक्यता आह़े