शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अडीच कोटींच्या दरोडय़ातील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 12:58 IST

24 तासात कारवाई : पाच संशयितांसह एक कोटी 35 लाख जप्त

नवापूर : दरोडय़ातील पाच संशयीतांना एक कोटी 35 लाख रुपयांसह जेरबंद करण्यात अवघ्या 24 तासात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. गुरुवारी दुपारी नवापूरनजीक सहा जणांनी चाकू व रिव्हाल्वरचा धाक दाखवून ही रक्कम लूटली होती. यामुळे खळबळ उडाली होती. संशयीतांना सुरत व मेहसाना येथून ताब्यात घेण्यात आले आहे.घटना घडताच पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार यांनी घटनास्थळी भेट देवून तपासाला दिशा दिली होती. एलसीबीचे निरीक्षक किशोर नवले, नवापूरचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत व सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाच पोलीस पथक तयार करून म्हैसाणा, सुरत व जळगांवच्या दिशेने रवाना करण्यात आले. संशयित आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या इनोव्हा कारचा मागोवा घेत पाच आरोपींना लुटून नेलेल्या रकमेसह ताब्यात घेण्यात पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत व सहका:यांना यश आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, लुटीच्या घटनेत सहा जणांचा सहभाग होता. त्यापैकी पाच जण पोलीसांच्या ताब्यात आले असून एक कोटी 22 लाख रुपये त्यांच्याकडुन हस्तगत करण्यात आले आहेत. सहाव्या आरोपीकडे काही रक्कम असल्याची कबुली त्या पाच जणांनी दिली. पोलीस पथक त्यांच्या मागावर आहेत. रक्कम वाहुन नेत असलेल्या टाटा सफारी वाहनातून 13 लाख रुपये पोलिसांना मिळुन आले असल्याने दोन कोटी 41 लाख 50 हजार रुपयांपैकी पोलीसांनी एक कोटी 35 लाख रुपये ताब्यात घेतले आहेत. सफारी वाहनाचे दोन चालक व त्यांचा एक साथीदार हे म्हैसाणा येथील राहणारे आहेत.घटना दिवसा अकरा वाजता घडली असतांना रात्री साडेनऊ वाजता घटनेची फिर्याद दिली जाते या संशयावरून तपास हाती घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नवापूर पोलीसांनी बारा तासाच्या आत गुन्ह्याचा छडा लावल्याचे ते म्हणाले. जिल्हा पोलीस दलाला मान खाली करावयास लावणा:या या घटनेचा ऐतिहासिक कामगिरी असा उल्लेख करीत त्यांनी आनंद व्यक्त केला. बालाजी एटरप्राइजेस जळगांव यांच्याकडुन पाठविण्यात येणारी भलीमोठी रक्कम त्यांचीच किंवा अन्य कुणाची याचाही तपास पोलीस करीत आहेत असे ते म्हणाले. आंगडियाची रक्कम वाहुन नेण्यासाठी सफारी गाडीत आसनाखाली एकुण चार ठिकाणी रक्कम ठेवण्यासाठी कप्पे बनविण्यात आले आहेत. एलसीबीचे निरीक्षक किशोर नवले,  नवापूरचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत व सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील, दिगंबर शिंपी, धनंजय पाटील, पोलीस उप निरीक्षक संदिप पाटील,  शिवाजी नागवे,  पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा पवार, महेंद्र नगराळे, योगेश थोरात, प्रविण मोरे, अनिल राठोड, शांतिलाल पाटील,                आदिनाथ गोसावी, जितेंद्र तोरवणे, हितेश पाटील, स्थानिक गुन्हे  अन्वेषण शाखेचे सुभाष तमखाने, प्रमोद सोनवणे, विकास पाटील यांच्यासह स्थानिक पोलीसांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले.