लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 7 : लगआसाठी काथर्दादिगर येथे आलेल्या युवकाचा खून झाल्याची घटना काकर्दादिगर, ता.शहादा येथे घडली. खुनाचे कारण समजू शकले नाही. अज्ञात मारेक:यांचा पोलीस शोध घेत आहे.विलास भागवत पाटील (30) रा.कौठळ, ता.धुळे, ह.मु.सुरत असे मयत युवकाचा नाव आहे. विलास पाटील हा युवक आपल्या मित्रांसह काकर्दादिगर, ता.शहादा येथे लगअ समारंभासाठी शनिवारी आला होता. शनिवारी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्याच्या डोक्यावर गंभीर वार करून त्याचा खून केला. युवकाचा मृतदेह गावातील हेमंत पाटील यांच्या खळ्याजवळ पडलेला आढळून आला. पोलीस पाटील रतिलाल सुकलाल शिरसाठ यांनी सारंगखेडा पोलिसात खबर दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील, सहायक निरिक्षक मनोहर पगार यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली.युवकाचा खून कशामुळे झाला ते समजू शकले नाही. पोलिस पाटलांच्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात मारेक:यांचा पोलिस शोध घेत आहेत.दरम्यान या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. लगआसाठी मित्रांसोबत आलेला हा युवक सायंकाळी व रात्री त्यांच्यासोबत फिरत होता. मग रात्री अचानक असे काय झाले जे त्याच्या मित्रांनाही कळू शकले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काकर्दादिगर येथे युवकाचा खून : कारण व मारेकरीही अज्ञात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 12:39 IST