शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा नजीक कंटेनरच्या धडकेत युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 11:27 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 16 : प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावरील केदारेश्र्वर मंदिराच्या वळणावर समोरुन भरधाव येणा:या कंटेनरनच्या धडकेत कवळीथ ता़ शहादा येथील प्रितेश राजेंद्र पाटील (27) हा युवक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली़ या वेळी अपघात घडताच क्षणी कंटेनसह चालकाने तेथून पळ काढला़ घटनेच्या निषेधार्थ जमावाने सुमारे ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 16 : प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावरील केदारेश्र्वर मंदिराच्या वळणावर समोरुन भरधाव येणा:या कंटेनरनच्या धडकेत कवळीथ ता़ शहादा येथील प्रितेश राजेंद्र पाटील (27) हा युवक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली़ या वेळी अपघात घडताच क्षणी कंटेनसह चालकाने तेथून पळ काढला़ घटनेच्या निषेधार्थ जमावाने सुमारे दोन तास प्रकाशा-तापी पुलावर रास्ता रोको आंदोलन केल़ेया बाबत मिळालेल्या माहितीनुसार कवळीथ ता़ शहादा येथील प्रितेश राजेंद्र पाटील हा युवक  नंदुरबार येथील सुजलॉन येथे अभियंता म्हणून नोकरीस होता़ सकाळची शिफ्ट असल्याने तो आपल्या दुचाकीने (क्र एमएच 39 टी 8350) प्रकाशा येथून नंदुरबारच्या दिशेने येण्यास निघाला़ या वेळी केदारेश्र्वर मंदिराच्या वळणावर समोरुन येणा:या कंटेनरला (एचआर 44) वळण घेता न आल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटून त्याने थेट दुचाकीस्वार युवकाला धडक दिली़ यात युवक साधारणत 20 फुटार्पयत कंटेनच्या चाकात अडकून फरफटत गेला़ त्यामुळे गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेचे वृत्त समजताच जमावाने पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली़ गंभीर घटना घडल्यानंतरसुध्दा पोलीस कर्मचा:यांनी कंटेनर चालकाला पकडण्यास ढिसाळपणा दाखविल्यामुळे जमावाकडून प्रकाशा-तापी पुलावर सुमारे दोन तास रास्ता रोको केला़ यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची मोठी गर्दी जमली होती़ पोलिसांकडून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न सुरु होता़ शहादा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े