तळोदा : आमलाड येथील पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगात जाणारी मोटारसायकल स्लीप झाल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत असे की, भरधाव वेगातील मोटारसायकल स्लीप हाेताच चालक फेकला जाऊन जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आमलाड गावाजवळी पेट्रोल पंपाजवळ घडली. मयत बंकट मंगल पाडवी (२५) व गंभीर जखमी लाला मनसेलाल पाडवी हे दोन्ही युवक तळोदा शहरातील कोल्ही हाटी येथील रहिवासी आहेत. हे दोन्ही युवक मोटारसायकल क्रमांक एमएच १५- डी.अे ६५८५ ने तळोदा येथून मोरवड चौगावा येथे जात असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास आमलाड गावाजवळ हा अपघात घडला. या घटनेची फिर्याद मयताचे वडील मंगल पाडवी, रा. कोल्ही हाटी यांनी पोलीस ठाण्यास दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे करीत आहेत.