काँग्रेसकडून देशभरात इंधन दरवाढ व महागाईविरोधात आंदोलन केले जात आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य दीपक नाईक यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शहरातील स्वस्तिक पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. नवापूर तालुक्यातून हजारोंच्या संख्येने नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतल्याची माहिती दीपक नाईक यांनी दिली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. यात पोस्टरबाजी करीत केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना केंद्र सरकारने केलेली इंधन दरवाढ अन्यायकारक असून इंधन दरवाढ त्वरित रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य दीपक नाईक, तानाजीराव वळवी, हेमंत पाटील, पराग नाईक, सामूवेल गावीत, युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
नवापुरात युवक काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST