शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

डीबीटी रद्द करण्याला आपले प्रथम प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : शासनाच्या योजना आदिवासी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : शासनाच्या योजना आदिवासी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी धडगाव, मोलगी व नळगव्हाण येथे आयोजित जाहीर सभेत बोलतांना व्यक्त केला.काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांची सभा शुक्रवारी झाली. यावेळी माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, आमदार उदेसिंग पाडवी, रतन पाडवी, हारसिंग पावरा, सी.के.पाडवी, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष बुला पाटील, बिज्या वसावे, सिताराम राऊत, पिरेसिंग पाडवी, शितल पाडवी आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना मंत्री अ‍ॅड.पाडवी म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या टीबीटीचा निर्णय रद्द करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. शासनाच्या योजनांचा वेग गेल्या पाच वर्षात कमी झाला होता. जनता अनेक योजनांपासून वंचीत राहिली आहे. भाजप सरकारच्या आदिवासी विरोधी धोरणामुळेच ते झाल्याचा आरोप त्यांनी केला. आदिवासी विकास विभागात झालेल्या घोटाळ्यांचा उल्लेख करीत त्यांनी विरोधी नेत्यांवर आरोप केला.जिल्ह्याच्या विकासासाठी काँग्रेसचे योगदान मोठे आहे. काँग्रेसच्या काळातच जिल्ह्यातील दुर्गम भागात पायाभूत विकास झाला. त्यामुळे जिल्ह्यातील जनता नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅड.पद्माकर वळवी, उदेसिंग पाडवी यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले.मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी नळगव्हाण, ता.तळोदा येथे माजी मंत्री दिगंबर पाडवी यांच्या स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर तेथे त्यांनी कार्यकर्त्यांनशी संवाद साधून छोटेखानी सभा देखील घेतली. त्यानंतर मोलगी व धडगाव येथे त्यांच्या सभा झाल्या.दरम्यान, मंत्रीपद मिळाल्यानंतर ते प्रथमच धडगाव तालुक्यात आल्याने त्यांचे प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.