शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 11:20 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 18 : मागील भांडणाच्या वादातून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरात मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली़ घटनेनंतर संतप्त जमावाकडून तोडफोड करण्यात येऊन पोलीस ठाण्यासमोर आरोपींच्या अटकेसाठी ठिय्या देण्यात आला़ रविंद्र सोमा सोनवणे (25) रा़पोलीस वसाहत हा मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास साक्री नाका परिसरात गेला असता, ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 18 : मागील भांडणाच्या वादातून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरात मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली़ घटनेनंतर संतप्त जमावाकडून तोडफोड करण्यात येऊन पोलीस ठाण्यासमोर आरोपींच्या अटकेसाठी ठिय्या देण्यात आला़ रविंद्र सोमा सोनवणे (25) रा़पोलीस वसाहत हा मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास साक्री नाका परिसरात गेला असता, त्याठिकाणी  गोलू रघुनाथ चौधरी, जयदीप रघुनाथ चौधरी, लकी दिपक चौधरी व सुनील ईशी यांच्यासोबत त्याचा वाद झाला़ यावेळी त्यांच्यात हाणामारीला सुरूवात झाली़ यादरम्यान चौघांनी  रविंद्र यास बेदम मारहाण केली़ प्रसंगी  रविंद्र याच्या शरीरावर बर्फ फोडण्याच्या कोचा व काठीचा वार करण्यात आल्याने जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला़ त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता, मयत घोषित करण्यात आल़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर संतप्त जमावाकडून साक्री नाका परिसर व नवापूर वळण रस्त्यावर काही ठिकाणी तोडफोड करण्यात येऊन जाळपोळ करण्यात आली़ बुधवारी पहाटेर्पयत शहरात तणाव कायम होता़ याबाबत मयताचे वडील पोलीस कॉन्स्टेबल सोमा रतन सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गोलू चौधरी, जयदीप चौधरी, लकी चौधरी व सुनील ईशी यांच्याविरोधात पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े