शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

उमराणीचे युवक सरसावले जलसंधारणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 12:32 IST

20 फुट लांबीचा माती बंधारा : युवकांचा उत्स्फुर्त सहभाग

मोदलपाडा : धडगांव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील उमराणी ब्रुद्रूक येथील पाणीटंचाई निवारण्यासाठी पाणी अडवा, पाणी जिरवासह जलसंधारणासाठी ग्रामस्थ व युवा वर्गाच्या मदतीने वनराई बंधारा बांधण्यात आला. त्यानुसार उमराणी खुर्द येथील नदीत 20 फुट  लांबीचा व दोन फुट उंचीचा माती बंधारा बांधण्यात आला. गावातील युवांनी या उपक्रमातुन समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. आदिवासी नवनिर्माण सेना व आदिवासी युवा एकता परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हा वनराई बंधारा बांधण्यात आला. या वनराई बंधा:यात साठलेल्या पाण्यामुळे शेतक:यांना लाभ होवून पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच जनावरांसाठीदेखील पाणी उपलब्ध होणार असून, त्याअनुषंगाने या बंधा:याचे काम करण्यात आले. गावातील चेतन पावरा यांच्या पुढाकाराने हा बंधारा बांधण्यात आला़  या बांधा:यासाठी लागणा:या रिकाम्या सिमेंटच्या पिशव्या व इतर साहित्य युवाकांनी उपलब्ध केले होते. हा बंधारा बांधण्यासाठी 100 सिमेंटच्या पिशव्या वापरण्यात आल्या़. उमराणी गावात हा पहिला वनराई बंधारा बांधण्यात आला असून, या अभिनव उपक्रमाचे  ग्रामस्थांनी कौतुक केले आह़े. समाजातील विविध घटकांनी भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त वनराई बंधारे बांधावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या गावात जाण्यासाठी असलेला मुख्य रस्ता नाल्यातून जातो. परंतु अद्यापर्पयत या मार्गावर फरशी पुल बांधण्यात आलेला नाही व गावातील लोकांना ये-जा करण्यासाठी वाहने नाल्यातूनच काढावी लागतात. या मार्गावर ठिकठिकाणी पाण्याची डबके साचत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या मार्गावर पाण्याची डबकी साचू नये यासाठी वनराई बंधा:याचे काम केले. दरम्यान ग्रामस्थांनी बांधलेल्या या वनराई बंधा:याची प्रशासनाने दखल घेवून या मार्गावरील नाल्यावर त्वरित फरशीपूल बांधून ग्रामस्थ व वाहनधारकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या बंधा:यासाठी ग्रामस्थ व युवा वर्गासह  प्रा.बटेसिंग पावरा, राजू पावरा, विक्रम पावरा, राजेंद्र पावरा,दिलीप पावरा, अमर पावरा, वसंत पावरा, किसन पावरा, दिनेश पावरा, रामचंद्र पावरा, संजय पावरा, सुनील पावरा, हर्षल पावरा, संदीप पावरा, हेमंत पावरा, रितेश पावरा, नितीन पावरा, दीपक पावरा, कमलेश पावरा, ईश्वर पावरा, कैलास पावरा आदी युवकांनी परिश्रम घेतले.