शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात शिरुडचा युवक ठार

By admin | Updated: February 10, 2017 00:30 IST

शहादा-अनरदबारी : एक जखमी, अज्ञात वाहनाची धडक

शहादा : शहादा ते सावळदा फाटय़ादरम्यान रिलायन्स पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक युवक जागीच ठार, तर दुसरा जखमी झाल्याची घटना गुरुवारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील शिरुड दिगर येथील ललित शशिकांत निकुंभे (22) व दीपक राजेंद्र महिरे (22) हे दोन्ही जण दुचाकीने (क्रमांक एमएच-39-आर-4957) सावळदा फाटय़ावरून शहाद्याकडे येत होते. रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ दोंडाईच्याकडे जाणा:या अज्ञात वाहनाने ओव्हरटेक करताना दुचाकीला जबर धडक दिली. त्यात ललित निकुंभे याच्या डोक्यावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर दीपक महिरे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर शहादा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक राकेश पाटील, सुनील पाटील आदींनी पालिकेत भेट देऊन मदत केली.शहादा ते अनरदबारी या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला खड्डे व रस्ता अरुंद असल्याने वारंवार अपघात होत आहेत. या रस्त्यादरम्यान असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ गेल्या सहा महिन्यांपूर्वी ट्रॅक्टर ट्रॉलीला ट्रकने धडक दिल्याने सहा महिला मजूर ठार झाल्या होत्या. गुरुवारीही त्याच ठिकाणी दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाला. आठवडाभरापूर्वी याच रस्त्यावरील मित्तल फायबर्ससमोर दुचाकी अपघातात दोन जण ठार झाले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले खड्डे बुजवून रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)