शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:28 IST

पोलीस सूत्रानुसार, शहादा-मंदाणे राज्य मार्गावरील कर्जोत गावाजवळ वीटभट्टीनजीक एक तरुण रक्तबंबाळ होऊन मृतावस्थेत असल्याचे रविवारी सकाळी आढळून आल्याने एकच ...

पोलीस सूत्रानुसार, शहादा-मंदाणे राज्य मार्गावरील कर्जोत गावाजवळ वीटभट्टीनजीक एक तरुण रक्तबंबाळ होऊन मृतावस्थेत असल्याचे रविवारी सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मयत तरुण हा भोंगरे, ता. शहादा येथील गणेश विजय अहिरे (२२) असल्याची ओळख पटली. गणेश हा एक महिन्यापासून नंदुरबार येथे कामाला होता. शनिवार, ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी भोंगरे गावाकडे मेहुण्यांसोबत प्रकाशा गावापर्यंत आला. तेथून तो मेहुण्यांना परत पाठवून एकटाच गावाकडे निघाला. शहादा येथील गाडी मिळाली नसल्याने त्याने पायीच रस्ता धरला. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने मंदाणे गावाकडे जाणाऱ्या वाहनांना हात देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु रात्र असल्याने कोणीही वाहन थांबविले नाही. गणेश हा रस्त्याने हात देत देत चालत राहिला. अशातच एका अज्ञात वाहनचालकाने बेजबाबदारपणे वाहन चालविल्याने रस्त्यावर पायी चालणाऱ्या गणेश अहिरे यास जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर वाहन चालक आपल्या वाहनासह पसार झाला. दुसऱ्या दिवशी रविवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी कर्जोत गावाजवळील वीटभट्टीजवळ कोणीतरी अज्ञात व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्याची वार्ता परिसरात पसरली. या घटनेची माहिती गणेशच्या परिवाराला मिळाल्याने परिवारातील सदस्यांनी आपल्या नातेवाइकांसह घटनास्थळी धाव घेतली. मृत पावलेला आपलाच मुलगा असल्याची खात्री पटल्यानंतर या घटनेची फिर्याद मयत गणेशचे वडील विजय कथ्थू अहिरे (रा. भोंगरा) यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात शहादा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार हे करीत आहे.