शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, व्यापा:यांच्या दृष्टीने यंदाची दिवाळी हिरमोड करणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकीकडे दिवाळीचा उत्साह तर दुसरीकडे पावसाचा कहर अशी स्थिती सध्या दिसून येत आहे. यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे दिवाळीचा उत्साह तर दुसरीकडे पावसाचा कहर अशी स्थिती सध्या दिसून येत आहे. यामुळे बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. वातावरणातील वारंवारच्या बदलांमुळे साथीचे आजार आणि डेंग्यूची साथ थैमान घालत आहे. यामुळे दिवाळीच्या आनंदावर विरंजन पडले आहे. यंदाची दिवाळी पावसातच जात असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून कुठे तुरळक तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. तीन दिवसांपासून तर सूर्यदर्शन देखील झालेले नाही. दिवाळीसारखा हर्ष उल्लास आणि आनंदाच्या सणावर पावसाने व्यत्यय आणला आहे. त्यामुळे व्यापा:यांसह सर्वसामान्यांचा हिरमोड झाला आहे. पिकांचे नुकसानखरीप पिकाची काही ठिकाणी काढणी झाली आहे तर काही ठिकाणी काढण्याच्या स्थितीत आहेत. त्यातच पावसाचा कहर सुरू असल्यामुळे शेतक:यांच्या हातातोंडाशी आलेला घास देखील हिरावला जात आहे. यंदा चांगले पजर्न्यमान, चांगली पीक परिस्थिती    यामुळे शेतकरी वर्गात समाधान आणि आनंदाचे वातावरण होते. परंतु पावसामुळे ज्वारी, सोयाबीन, मका यांना कोंब फुटू लागले आहेत. काही ठिकाणी कणसं सडली आहेत. यामुळे शेतक:यांचे मोठे नुकसान झाले आहे.व्यापा:यांचा हिरमोडदिवाळीचा खरेदीचा उत्साह सर्वत्र असतांना पावसाच्या संततधारेमुळे त्यावर परिणाम दिसून येत आहे. विशेषत: लहान व रस्त्यावरच्या व्यापा:यांना त्याचा    मोठा फटका सहन करावा लागत  आहे. याउलट इलेक्ट्रॉनिक वस्तू, चैनिच्या वस्तूंना मागणी चांगली असल्यामुळे मोठे व्यापारी समाधानी आहेत. परंतु हातावर पोट असलेल्या व्यापा:यांच्या   व्यवसायावर त्याचा परिणाम झाल्यामुळे मोठय़ा संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. अनेक व्यापा:यांनी ती खंत बोलून देखील दाखविली आहे. आधीच पावसाळ्यात मंदीचे सावट होते आता दिवाळीतही अपेक्षीत व्यवसाय न झाल्याने नाराजीही व्यक्त केली. 

उलाढाल निम्म्यावर.. यंदाच्या दिवाळीतील उलाढाल निम्म्यावर आली आहे. निवडणुकांमुळे 21 तारखेर्पयत बाजारात फारशी रौनक नव्हती. निवडणुका संपल्यानंतर पावसाने व्यत्यय     आणला आहे. यामुळे दिवाळीसारख्या सणाला व्यवसाय होत नसल्याने लहान व मध्यम व्यापारी हैराण झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी पावसाने उघडीप दिल्याने आणि वातावरणही सर्वसामान्य राहिल्याने बाजारात मोठय़ा प्रमाणावर गर्दी   उसळली होती. दोन दिवसांपासून तर वर्दळच कमी झाल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे. यामुळे दिवाळीसाठी लागणा:या वस्तूंची मागणी निम्म्यावर आली आहे.