शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

यंदा १३ लाख पुस्तकांचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 12:51 IST

नंदुरबार : समग्र शिक्षा अभियान २०१९-२०२० मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात १३ लाख ४६७ पुस्तकांचा पुरवठा ...

नंदुरबार : समग्र शिक्षा अभियान २०१९-२०२० मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात १३ लाख ४६७ पुस्तकांचा पुरवठा नाशिक येथील बालभारतीच्या विभागीय कार्यालयाकडून करण्यात येणार आहे़ आतापर्यंत केवळ तळोदा व धडगाव तालुक्यांनाा १ लाख ३६ हजार ८९ पुस्तकांचा पुरवठा करण्यात आलाय़दरम्यान, १७ जून रोजी उन्हाळी सुट्यांनंतर प्राथमिक शाळांच्या सत्रांना सुरुवात होणार आहे़ त्या आधी म्हणजे ५ जूनपर्यंत सर्व तालुक्यांना मागणीनुसार पुस्तकांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचा दावा प्राथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे़ ५ जूनला सर्व तालुक्यांना पुस्तके प्राप्त होऊन त्यानंतरच्या आठवड्यात संबंधित केंद्र प्रमुखांना पुस्तकांचे वाटप करुन ते शाळानिहाय विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़दरम्यान, नंदुरबार तालुक्यातील पहिली ते आठवीच्या एकूण ५१ हजार ७१ लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी २ लाख ८७ हजार १९७ पुस्तकांचे नियोजन आहे़ नवापूर तालुक्यातील पहिली ते आठवीच्या एकूण ३२ हजार १४७ लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी १ लाख ७९ हजार १८८ पुस्तकांचे नियोजन आहे़ शहदा तालुक्यातील पहिली ते आठवीच्या एकूण ५९ हजार २५८ लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी ३ लाख ३१ २३२ पुस्तकांचे नियोजन आहे़ तळोदा तालुक्यातील पहिली ते आठवीच्या २३ हजार लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी १ लाख २७ हजार ९७६ पुस्तकांचे नियोजन आहे़ अक्कलकुवा तालुक्यासाठी पहिली ते आठवीच्या ३८ हजार १६९ लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी २ लाख ९ हजार २९२ पुस्तकांचे नियोजन आहे़ तर धडगाव तालुक्यातील ३० हजार ८०० लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी १ लाख ६५ हजार ५८२ पुस्तकांचे नियोजन आहे़ अशा प्रकारे एकूण २ लाख ३४ हजार ४४७ विद्यार्थ्यांसाठी १३ लाख ४६७ पुस्तकांचे नियोजन प्राथमिक शिक्षणविभागाकडून करण्यात आले आहे़ अद्याप तळोदा व धडगाव तालुक्याला पुस्तकांचा पुरवठा झाला आहे़