शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांच्या गुणवत्तेवर यंदाही भरारी पथकांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:29 IST

नंदुरबार : दोन लाख ७२ हजार हेक्टर क्षेत्रात होणाऱ्या खरीप पेरण्यांसाठी यंदाही खते आणि बियाण्याचे आवंटन होणार आहे़ यातील ...

नंदुरबार : दोन लाख ७२ हजार हेक्टर क्षेत्रात होणाऱ्या खरीप पेरण्यांसाठी यंदाही खते आणि बियाण्याचे आवंटन होणार आहे़ यातील बियाण्यांची गुणवत्ता तपासून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर सात पथकांची निर्मिती कृषी विभागाने केली आहे़जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ़ बी़एऩपाटील व कृषी विकास अधिकारी पी़एस़लाटे यांंनी संयुक्तपणे या पथकांची निर्मिती केली आहे़ जिल्हा परिषद कृषी विभागाने राज्य कृषी विभागाकडे १ लाख ५८० मेट्रीक टन खतांची मागणी नोंदवली होती़ हे खत येत्या काळात जिल्ह्यात येणार आहे़ अनुदानित तत्त्वावर या खतांची विक्री करण्याचे आदेश आहेत़ तत्पूर्वी ३० मे पासून जिल्ह्यात बियाण्यांची व्रिक्री सुरु होण्याचा अंदाज आहे़ यासाठी ३७ हजार ७८३ मेट्रीक टन बियाणे मागवण्यात येणार आहे़ यात ४ लाख ६५ हजार पाकिटे बियाणे हे कापसाचे आहे़ गेल्या काही वर्षात बोगस बियाण्यांमुळे शेतकºयांना फटका बसून त्यांच्या उत्पन्नात घट आल्याचे प्रकार घडले आहेत़ यामुळे कृषी विभागाकडून गेल्या वर्षापासून बियाणे येण्यापूर्वी त्यांचे नमुने प्रयोगशाळेतून तपासून मान्यता देण्यात येत आहे़गेल्या वर्षात जिल्हा परिषद कृषी विभागाने तपासणी केलेल्या १५५ तर राज्य शासन कृषी विभागाने १६५ बियाणे नमुने संकलित करुन त्यांची तपासणी केली होती़ यातील ३ बियाण्यांचे नमुने दोषी आढळल्याने त्यांची विक्री थांबवण्यात आली होती़ तिन्ही कंपन्यांवर बियाणे नियंत्रण अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली होती़ तसेच गतवर्षी भरारी पथकांनी जिल्ह्यातील विविध भागात भेटी देत बियाणे नमुने चाचपणी केली होती़ यात सहा बियाणे हे बोगस असूनही त्यांची विक्री होत असल्याचे उघडकीस आले होते़ सर्व सहा बियाणे विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करुन न्यायालयीन कारवाई सुरु आहे़ यंदाच्या वर्षात बोगस बियाणे विक्री आढळून आल्यास तात्काळ कारवाई करुन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत़