शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

टाकाऊ डांबर सुसरी धरणात टाकल्याने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 13:47 IST

सुसरी धरण : शहादा-खेतिया रस्ता रुंदीकरण करणा:या ठेकेदाराचा प्रताप

शहादा तालुक्यातील शहादा-खेतिया रस्त्यावर दरा फाटय़ाजवळील सुसरी नदीवरील सुसरी धरणात रस्ता काम सुरू असताना त्यातील टाकाऊ खडी व डांबर टाकल्याने शेतक:यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. धरणात टाकलेले हे साहित्य उचलण्याबाबत ठेकेदाराला संबंधित विभागाने तंबी देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.सध्या शहादा-खेतिया रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम करीत असताना रस्त्यावरील टाकाऊ डांबर व इतर साहित्य ठेकेदाराने नियोजित जागेवर न टाकता चक्क सुसरी धरणात फेकून दिले. धरणात या टाकाऊ साहित्याचे ढीग लावले आहेत.  शासनाकडून दरवर्षी सुसरी धरणातील गाळ काढण्याचे काम केले जाते. सातपुडय़ाच्या पायथ्यातून वाहणा:या या नदीच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगाने येतो व परिसरातील शेतक:यांना या जलसाठय़ाचा उपयोग होतो. पावसाळ्यापूर्वी परिसरातील शेतकरी आपआपल्या वाहनाने धरणातील गाळ शेतार्पयत मोठय़ा कष्टाने घेऊन जातात. त्यामुळे धरणातील पाण्याच्या साठय़ात वाढ होते. शेतकरी सामूहिकपणे दरवर्षी हा उपक्रम राबवतात. असे असताना शहादा-खेतिया रस्त्याचे रुंदीकरण करणा:या ठेकेदाराने कमालच केली.या ठेकेदाराने कुठलाही विचार न करता रस्त्यावरील वाया जाणारे डांबर डंपराच्या सहाय्याने धरणाच्या मधोमध टाकून दिले आहे. पाण्याच्या प्रवाहाने हे डांबर जर धरणाच्या कडेर्पयत जाऊन पोहोचले तर पाण्याचा निचरा कमी होण्याची शक्यता आहे. टाकाऊ डांबर हे पर्यावरणासाठी धोक्याचे असल्याचे सांगितले जात आहे. दरवर्षी येथे नवलपूर ग्रामस्थांमार्फत तीन ते चार महिन्यासाठी मत्सउद्योग केला जातो. जर पाण्यावर तरंगणारे डांबर मासळीच्या पोटात गेले तर या व्यवसायासाठीही धोका निर्माण होऊ शकतो. संबधित लघुसिंचन विभागाच्या अधिका:यांनी धरणात टाकलेले डांबर तात्काळ उचलण्याबाबत संबंधित ठेकेदाराला तंबी द्यावी, अशी अपेक्षा या  शेतक:यांकडून व्यक्त होत आहे.