शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गपूजन दिनानिमित्त बारगळ गढीचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 14:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : दुर्गपूजन दिनानिमित्त तळोदा येथील ऐतिहासिक बारगळ गढीच्या प्रवेशद्वाराचे पूजन करण्यात आले. प्राचीन, ऐतिहासिक वास्तूची ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : दुर्गपूजन दिनानिमित्त तळोदा येथील ऐतिहासिक बारगळ गढीच्या प्रवेशद्वाराचे पूजन करण्यात आले. प्राचीन, ऐतिहासिक वास्तूची सांस्कृतिक माहितीचे जतन व संर्वधनसाठी दुर्गपूजन या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.नबारगळ गढीच्या प्रवेशद्वार पूजन कार्यक्रमास बारगळ गढीचे वंशज जहागिरदार अमरजित बारगळ, आतिष बारगळ, नीरज बारगळ ऋषिकेश बारगळ उपस्थित होते. गढीच्या प्राचीन वास्तू सोबतच ध्वज पूजन, विविध हत्यारे यांचे देखील पूजन करण्यात आले़ याप्रसंगी तळोद्याचे जहागीरदार बारगळ यांनी दुगंर्पूजन उपक्रमाची माहिती देतांना सांगितले की, मागील तीन वर्षांपासून या उपक्रमाची सुरुवात तळोद्यातून करण्यात आली. हा उपक्रम राज्यात गेल्या २३ वर्षांपासून राबविला जात आहे.प्राचीन ऐतिहासिक वास्तूची जतन व संवर्धन व्हावे तसेच सांस्कृतिक वारशाची माहिती युवा वर्गाला व्हावी या उद्देशाने उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. पुण्यातील मिलिंद क्षिरसागर यांची हि संकल्पना होती. यावर्षी तळोद्यासह थाळनेर, तोरखेडा याठिकाणी देखील दुर्गपुजन हा उपक्रम आयोजित करण्यात आला. खान्देशातील ऐतिहासिक वास्तू म्हणून गढीची ओळख आहे.